आशाताई बच्छाव
देगलूर तालुक्यात विविध ठिकाणी शिवसेना-युवा सेनाच्या
शाखेच्या नामफलकाचे अनावरण.
देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)
देगलूर:- तालुक्यातील खुतमापुर, भुतनहिप्परगा, किनी, ढोसणी आदी गावात शिवसेना, युवा सेनेच्या शाखेच्या नामफलकाचे अनावरण.दि.16 फेब्रुवारी रोजी करण्यात आले यावेळी मराठवाडा युवासेना नेते मा.महेश खेडकर, युवा सेना जिल्हा विस्तारक मा. विशाल सावंत, युवा सेना जिल्हा प्रमुख मा. बालाजी पाटील शिंदे नागणीकर, शिवसेना जिल्हा संघटक मा.विजय मुंडकर , शिवसेना देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख माश्री संदीपजी महीडा, शिवसेना देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख मा.सुनिल एबंडवार, उपजिल्हाप्रमुख महेश पाटील देगलूर शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, शिवसेना देगलूर शहर प्रमुख बालाजी मैलागिरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सुधाकर उल्लेवार शिवसेना समन्वयक विनोद सोनकांबळे, युवा सेना तालुका प्रमुख संतोष जाधव भुतनहिप्परगेकर, युवा सेना तालुका समन्वयक तथा शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख भागवत पाटील सोमुरकर, नांदेड युवा सेना शहरप्रमुख मा. नागरगोजे आदीसह असंख्य पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.






