Home नांदेड मुखेड तालुक्यातील तुपदाळ येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू.

मुखेड तालुक्यातील तुपदाळ येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू.

102
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील तुपदाळ येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील तुपदाळ येथील शेतकरी रमेश पंढरीनाथ दोमाटे वय 52 वर्ष यांच्या अंगावर आज दिनांक 7 मे रोजी दुपारी अंदाजे दोनच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नेहमीप्रमाणे रमेश दोमाटे हे आपल्या शेतातील मशागतीच्या कामासाठी गेले होते. दुपारी दोन वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह पावसाची सुरुवात झाली. यात रमेश दोमाटे यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी मुली मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच गावावर व परिसरात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here