Home अमरावती अमरावतीच्या जागेवर रिपाइंचा दावा; समविचा पक्ष सोबत मैत्री करू अन्यथा एकाला चलो!

अमरावतीच्या जागेवर रिपाइंचा दावा; समविचा पक्ष सोबत मैत्री करू अन्यथा एकाला चलो!

35
0

आशाताई बच्छाव

IMG_20240203_221421.jpg

अमरावतीच्या जागेवर रिपाइंचा दावा; समविचा पक्ष सोबत मैत्री करू अन्यथा एकाला चलो!
————
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे अमरावती मतदारसंघावर नैसर्गिक न्याय संघ रिपाईचा (गवई गट) दावा असून, तो कायम आहे. महाविकास आघाडीकडे तसा प्रस्ताव दिला असून, समविचार पक्षासोबत मैत्री व्हावी, याला प्राधान्य आहे. मात्र, या मैत्रीचा प्रस्ताव अमान्य झाल्यास अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार अशी भूमिका राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी शुक्रवारी पत्र परिषदेत स्पष्ट केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापना केलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मूळ पक्षाचे प्रतिनिधित्व गवई गटाकडे आहे. सत्तेपासून धर्मांध शक्तींना दूर ठेवण्यासाठी रिपाईने सातत्याने पुढाकार घेतला आहे. मात्र महा विकास आघाडी रिपाईला बाजूला ठेवत असेल तर आम्हाला देखील वेगळा निर्णय घेता येतो. मग महाविकास आघाडी असो वा महायुती आघाडी असो वा महायुती असो. राजकीय दृष्टी निर्णय हा समविचार पक्षांना द्यायचा असल्याने डॉ गवई म्हणाले. राज्यात अमरावती, सोलापूर, भंडारा, गोंदिया ,चंद्रपूर व मुंबई अशा पाच लोकसभेच्या जागा लढविण्याची रिपाईची तयारी आहे. महाविकास आघाडीने रिपाईचा प्रस्ताव मान्य करावा, अशी अपेक्षा आहे. अन्यथा एकला चलो अशी भूमिका राहील, असेही डॉ. गवई यांनी सांगितले. पत्रपरिषदला रिपाईची जिल्हाध्यक्ष हेमंत ढोले, अर्जुन खंडारे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here