Home नांदेड लोहा सार्वजनिक शिवजयंती मंडळ अध्यक्षपदी पैलवान नारायण पवार तर सचिव पदी शहाजी...

लोहा सार्वजनिक शिवजयंती मंडळ अध्यक्षपदी पैलवान नारायण पवार तर सचिव पदी शहाजी पवार यांची निवड

34
0

आशाताई बच्छाव

IMG_20240203_221907.jpg

लोहा सार्वजनिक शिवजयंती मंडळ अध्यक्षपदी पैलवान नारायण पवार तर सचिव पदी शहाजी पवार यांची निवड

लोहा प्रतिनिधि अंबादास पाटील पवार 

लोहा सार्वजनिक शिवजयंती मंडळ कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी पै. नारायण पवार तर सचिव पदी पत्रकार शहाजी पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नांदेडचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्ष शासनाने निश्चित केलेल्या तारखेनुसार लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात येते. यावर्षी देखील शिवजन्मोत्सव सोहळा हार्ष उल्हासात साजरा करण्यासाठी दि. ३ फेब्रुवारी रोजी शनिवारी शहरातील खा. चिखलीकर संपर्क कार्यालयात युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती मंडळ कार्यकारिणी निवड करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. याप्रसंगी शिवजयंती उत्सव मंडळ पुढीलप्रमाणे अध्यक्ष- पै.नारायण पाटिल पवार, उपाध्यक्ष – पै.गणेश पाटिल कल्याणकर, पै.हनमंत पाटिल मोरे, सचिव- शहाजी पाटिल पवार, प्रसिद्धी प्रमुख- पत्रकार अंबादास पाटिल पवार, केशव पवार, इमाम लदाफ, सहसचिव- दिलीप कानोडे, कोषाध्यक्ष- सुर्यकांत गायकवाड, सहकोषाध्यक्ष- राजेश बोडके, मिरवणूक प्रमुख- बंटी मुरकुटे, शांतता समिती प्रमुख- अनिल धुतमल, रवि वाघमारे तर सदस्य म्हणून बाळासाहेब कळकेकर, पिराजी पवार, गणपत केंद्रे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सदरील बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किरण वट्टमवार, केशवराव मुकादम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, नगरसेवक भास्करराव पाटील पवार, बालाजी खिल्लारे, उपनगराध्यक्ष दत्ता वाले, सचिन चव्हाण, दिपक पाटील कानवटे आदींसह बहुसंख्येने उपस्थिती होती.

Previous articleअमरावतीच्या जागेवर रिपाइंचा दावा; समविचा पक्ष सोबत मैत्री करू अन्यथा एकाला चलो!
Next articleमनन चिंतन🌼 विषय:- आजच्या स्त्रीच्या विवाहातील अस्थिर तीन कोन.?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here