Home जालना सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली  घनसावंगीत भाजपाची लाट

सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली  घनसावंगीत भाजपाची लाट

18
0

आशाताई बच्छाव

IMG_20240217_171854.jpg

सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली  घनसावंगीत भाजपाची लाट

जिरडगाव, भार्डी गावातील शेतकरी, युवकांनी केला पक्ष प्रवेश  

अंबड / घनसावंगी जालना दिलीप बोंडे:  भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांनी  घनसावंगी तालुक्यातील गावागावात  विकासपर्व सुरु केले आहे. त्यांच्या कार्यामुळे घनसावंगी मतदारसंघात भाजपाची लाट तयार झाली असून गावागावातील युवक, शेतकरी भाजपमध्ये दाखल होत आहे. गुरुवारी घनसावंगी तालुक्यातील जीरडगाव व अंबड तालुक्यातील भार्डी येथील राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सतीश घाटगे यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केला.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्धी साखर कारखान्याच्या माध्यमातून सतीश घाटगे यांनी  मान, सन्मान आणि स्वाभिमान मिळवून देत उसाचे राजकारण मोडीत काढले आहे. तसेच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गावागावातील विकासाचे प्रश्न ते सहज सोडवत आहेत.त्यामुळे  गाव पातळीवर युवक, शेतकरी  सतीश घाटगे यांच्या पाठीमागे उभा राहत आहेत. घनसावंगी तालुक्यातील  जिरडगावचे माजी सरपंच सखाराम गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब उगले यांच्यासह गावातील शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केला. तसेच भार्डीचे  सरपंच नवनाथ डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील युवकांनी सतीश घाटगे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी दादासाहेब उढाण, माजी सरपंच सखाराम गायकवाड, माजी ग्रामपंचायत पंचायत सदस्य बाबासाहेब उगले, हरिभाऊ उगले, सिद्धेश्वर उगले, बाबासाहेब उगले, विजय उगले, पांडुरंग माने, आनंद माने, सुरेश वाव्हुळे, नितीन मानेकर, विक्रम वाव्हुळे, वैभव वाव्हुळे, मच्छिंद्र साबळे, रफिक सय्यद, राहुल गीतखने,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here