Home जालना शिवजयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष अशोक...

शिवजयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष अशोक पडुळ यांची पत्रकार परिषदेत माहिती

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20240217_171531.jpg

शिवजयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष अशोक पडुळ यांची पत्रकार परिषदेत माहिती
जालाना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) : मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिवजन्मोत्सव सोहळा यावर्षी उत्साहात पार पाडण्याचा मानस असून भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अशोक पडुळ यांनी दिली. शहरातील भाग्यनगर येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील, संतोष गाजरे, जगन्नाथ काकडे, समितीचे सचिव अरविंद देशमुख, सुनिल रत्नपारखे, सागर पाटील, बाळासाहेब देशमुख, इब्राहिम शेख, रमेश गजर, प्रताप देठे, संतोष कऱ्हाळे, किरण सिरसाठ, काकासाहेब खरात, दिपालीताई दाभाडे, स्वर्णाताई राऊत, ज्योतीताई मुजमुले आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी प्रास्ताविक करतांना जगन्नाथ काकडे म्हणाले की, मराठा क्रांती मोर्चा ही चळवळ जेेव्हा फोफावली त्यावेळी केवळ या चळवळीला मराठा समाजाचाच शिक्का बसलेला होता. परंतू, हा शिक्का पुसल्या जाईल आणि ही चळवळ सर्वांचीच आहे, त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आम्ही 2019 सालापासून शिवजयंती महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलात देखील आणला, असेही श्री. काकडे यांनी सांगितले. तसेच  डॉ. संजय लाखे पाटील यांनीही मार्गदर्शन केले. श्री. पडुळ यांनी सांगीतले की, दि. 17 फेब्रुवारी शनिवारी सकाळी 11 वाजता शासकीय निरिक्षण गृह संजयनगर व अंबड चौफुली येथील राधाबाई बाल आश्रम येथे शालेय साहित्य (स्कुल बॅक, कंपास बॉक्स) वाटप करण्यात येणार असून दि. 18 फेब्रुवारी रविवारी सकाळी 11 वाजता अंकुर बालक मंदिर डबलजीन जुना जालना येथे छत्रपती शिवराय व गड किल्ले या विषयावर रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण�

Previous articleकेंद्र सरकारच्या विरोधात विरोधकांचा एल्गार ! निवडणूकांमध्ये भाजपचे सरकार उलथवून टाकण्याचे आवाहन
Next articleसतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली  घनसावंगीत भाजपाची लाट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here