Home जालना अंगणवाडी सेविकेच्या मुलीच्या लग्नासाठी समृद्धी ट्रस्टची मदत

अंगणवाडी सेविकेच्या मुलीच्या लग्नासाठी समृद्धी ट्रस्टची मदत

105

आशाताई बच्छाव

IMG_20240217_172354.jpg

अंगणवाडी सेविकेच्या मुलीच्या लग्नासाठी समृद्धी ट्रस्टची मदत

वैशालीताई घाटगे यांच्या 21 हजाराचे कन्यादान

घनसावंगी जालना / दिलीप बोंडे: समाजातील तळागाळातील गरीब घटकांच्या घरापर्यंत पोहचवून शासनाच्या योजना आणि आरोग्य सेवा देण्याचे कार्य आशा, अंगणवाडी सेविकां करतात. त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी समृद्धी ट्रस्टच्या माध्यमातून शुभमंगल कन्यादान योजना राबविण्यात येते. या योजनेंअंतर्गत राहेरा येथील अंगणवाडी सेविका विजयमाला कोरडे यांच्या मुलीच्या लग्नासाठी समृद्धी ट्रस्टच्या अध्यक्षा वैशाली सतीश घाटगे यांच्या हस्ते कन्यादान म्हणून 21 हजार रूपांची मदत करण्यात आली.

समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या संकल्पनेतून आशा, अंगणवाडी सेविकेंच्या मुलीच्या लग्नासाठी समृद्धी ट्रस्टच्या माध्यामतून शुभमंगल कन्यादान योजना राबविण्यात येते. या योजनेंअंतर्गत आतापर्यंत अंबड घनसावंगी तालुक्यातील अनेक अंगणवाडी व आशा सेविकांना समृद्धी ट्रस्टच्या अध्यक्षा वैशाली सतीश घाटगे यांनी  २१ हजाराची मदत केली आहे. या योजनेअंतर्गत घनसावंगी तालुक्यातील राहेरा येथील  अंगणवाडी सेविका विजयमाला कोरडे यांना मुलीच्या लग्नासाठी मदत करण्यात आली. या मदतीबद्दल कोरडे  दाम्पत्यांनी सतीश घाटगे व वैशाली घाटगे यांचे आभार मानले.  समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून सतीश घाटगे यांच्या संकल्पनेतून ही योजना घनसावंगी मतदारसंघातील आशा, अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तक महिलांसाठी राबविण्यात येत असल्याचे यावेळी वैशाली घाटगे यांनी सांगितले

Previous articleसतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली  घनसावंगीत भाजपाची लाट
Next articleनांदेडच्या तख्त सचखंड गुरुद्वारा अधिनियम निर्णय रद्द करण्याची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.