Home उतर महाराष्ट्र नांदेडच्या तख्त सचखंड गुरुद्वारा अधिनियम निर्णय रद्द करण्याची मागणी

नांदेडच्या तख्त सचखंड गुरुद्वारा अधिनियम निर्णय रद्द करण्याची मागणी

106

आशाताई बच्छाव

IMG_20240217_173026.jpg

श्रीरामपूर (वार्ताहर दिपक कदम तालुका प्रतिनिधी)-राज्य सरकारने नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा निर्णय लगेच रद्द करण्यात यावी
या निर्णयाचे श्रीरामपूर येथील सिख पंजाबी समाजाचा जाहीर निषेध करून प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
येथे गुरुद्वारा श्री गुरु सभा सिख पंजाबी समाजाच्यावतीने प्रांतकार्यालयात जाऊन प्रांतअधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी गुरुबचन सिंग चुग, लकी सेठी, सरबजीतसिंग सेठी, गुलशन कंत्रोड, रिम्पी चुग, तेजेंद्रसिंग सेठी, तमन भटियानी, हिरासिंग भटियानी, अमरकसिंग चुग, अमरप्रीतसिंग सेठी ,बंटीसेठ गुरुवाडा,प्रीतीपालसिंग बतरा,मोहनसिंग कथुरिया,अमरमितसिंग चुग,मनजीतसिंग चुग,जसबीरसिंग चुग,अमरमितसिंग गुरुवाडा,गुरुमितसिंग ठकराल,श्रीकृष्ण बडाख,मनजितसिंग चुग,
आदींसह सिख समाजातील बांधव यावेळी उपस्थित होते.
पत्रकात म्हंटले आहे की ,नुकतेच राज्य सरकारने सोमवार दिनांक ५ फेब्रुवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम
नांदेड येथील गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम २०२४ लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या विधेयकाचे प्रारूप मान्य झाल्यानंतर दि नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब निवडणूक नियम व त्याचे उपविधी तयार करण्यात येतील. गुरुद्वाराच्या १९५६च्या अधिनियमात सुधारणा करण्यासाठी न्या. जे. एच. भाटीया अभ्यास समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयीन प्रकरणांच्या पार्श्वभुमीवर आणि अभ्यास समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
सदर निर्णय घेताना समाजातील प्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आलेले नाही
राज्य सरकारकडून नेमण्यात येणारे प्रतिनिधी हे या ठिकाणी आल्यास त्यांना तख्त नांदेड येथील मर्यादा माहित नसतील आणि त्यामुळे त्या ठिकाणी धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे.
सदर निर्णय हा अन्यायकारक असून अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक संस्थेत दखल घेण्यासाठी घेण्यात आलेला आहे.
हा निर्णय लगेच रद्द करण्यात यावी तसेच येत्या काळात समाजा संदर्भात किंवा समाजाच्या वास्तु संदर्भात कुठलेही निर्णय घेताना समाजातील लोकांना विधासात घेण्यात यावे.
सदर निर्णयाचे श्रीरामपूर येथील सिख पंजाबी समाजाचा जाहीर निषेध करत आहे.

श्रीरामपूर – राज्य सरकारने नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा निर्णय लगेच रद्द करण्यात यावी या निर्णयाचे श्रीरामपूर येथील सिख पंजाबी समाजाचा जाहीर निषेध करून प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गुरुबचन सिंग चुग, लकी सेठी, सरबजीतसिंग सेठी, गुलशन कंत्रोड, रिम्पी चुग, तेजेंद्रसिंग सेठी, तमन भटियानी, हिरासिंग भटियानी, अमरकसिंग चुग, अमरप्रीतसिंग सेठी आदी.(छाया- अनिल पांडे)

Previous articleअंगणवाडी सेविकेच्या मुलीच्या लग्नासाठी समृद्धी ट्रस्टची मदत
Next articleशब्दगंध चा कॉ.गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार कॉ.नारायण गायकवाड यांना जाहिर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.