Home नाशिक के. के. वाघ महाविद्यालय, चांदोरी येथे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग अंतर्गत...

के. के. वाघ महाविद्यालय, चांदोरी येथे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग अंतर्गत कार्यशाळा– ‘स्पर्धात्मक परीक्षा’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन

38
0

आशाताई बच्छाव

IMG_20240117_204718.jpg

के. के. वाघ महाविद्यालय, चांदोरी येथे आजीवन अध्ययन व विस्तार विभाग अंतर्गत कार्यशाळा–

‘स्पर्धात्मक परीक्षा’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन–

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

के.के .वाघ कला, वाणिज्य, विज्ञान आणि संगणक महाविद्यालय चांदोरी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या सयुंक्त विद्यमाने व आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत स्पर्धात्मक परीक्षा कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी श्री केशव महाले (संचालक महाले आयएस अकॅडमी) आणि श्री विशाल बागुल (संचालक गाईडन्स क्लासेस नाशिक) हे तज्ञ व्याख्याते म्हणून उपस्थित होते . .
स्पर्धात्मक परीक्षा कार्यशाळेची सुरवात दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली . प्रा. एस. एस. जाधव यांनी कार्यक्रमाचा हेतू व उद्देश प्रस्ताविकाद्वारे स्पष्ट करून दिला. कार्यशाळेतील प्रथम पुष्प श्री केशव महाले यांनी गुंफले. स्पर्धा परीक्षांची ओळख व स्वरूप या विषयांच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या मार्गदर्शनात एम.पी.एस.सी, यु,पी,एस,सी, परीक्षांचे स्वरूप, व रचना , अभ्यासक्रम याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षा ज्यात आर्मी, नेव्ही, तलाठी, स्टाफ सिलेक्शन आदि परीक्षा विषयी विद्यार्थ्याना माहिती दिली. स्पर्धा परीक्षा देताना विविध पदाकरिता कोणत्या परीक्षा व त्यांचे योग्य स्वरूप विद्याथ्यांना ज्ञात असणे गरजेचे आहे तरच तुम्ही योग्य पद्धतीने नियोजन व तयारी करू शकता असे त्यांनी सागितले. विविध पदाकरिता लागणारी अहर्ता, वय, शिक्षण, आदि विषयवार त्यांनी माहिती दिली. स्पर्धात्मक परीक्षा कार्यशाळेतील दुसरे पुष्प श्री विशाल बागुल यांनी गुंफले, आपले व्याख्यानात त्यांनी’ स्पर्धा परीक्षांची तयारी व अभ्यास’ या विषयावर बोलताना विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना एम.पी.एस.सीचा अभ्यास सुरू करणे आवश्यक आहे. आपल्याला जर आयुष्यात यश मिळवायचे असेल तर कठीण परिश्रम घेणे आवश्यक आहे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते, असे मत व्यक्त केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी संदर्भ पुस्तकें मासिके, वृत्तपत्र वाचन आदि मुद्यावर सविस्तर विवेचन दिले..तसेच दोन्ही वक्तांनी विद्यार्थ्यांच्या शकांचे निरसन केले.प्रत्येकाने आपल्या उराशी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगावे व ते तडीस नेण्यासाठी मेहनत घ्यावीअसे आवाहन केले.
सदर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सविता सावंत होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सदर कार्यशाळेचा उद्देश हा होता की महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थांना विद्यार्थी दशेतच स्पर्धा परीक्षा विषयी माहिती मिळावी व पुढे जाऊन त्यांना आपले उज्वल भविष्य व करिअर करतील असे प्रतिपादन केले . कार्यशाळेच्या नियोजनासाठी प्रा. प्रवीण आहेर यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन कु. आकाश गारे आणि कु. चैतन्य शेळके यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा, एस.बी. भालेराव यांनी केले. .कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा बकरे एस. एस. प्रा कदम पी. एस. प्रा. सुरवाडे एस. एस. कडाळे आर. एस, श्री कुणाल निकम, श्री कृष्णा शिंदे, सागर बर्वे यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेसाठी सर्व स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleसुमेध बुद्ध विहार एकोडीच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन
Next articleपोलिसाच्या खुनातील आरोपीना फाशी व्हावी – 22 रोजी चाळीसगाव येथे आक्रोश मोर्चा व रास्ता रोको
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here