Home कोल्हापूर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे् यांच्या वाढदिवसानिमित्त निष्ठा रॅली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे् यांच्या वाढदिवसानिमित्त निष्ठा रॅली.

39
0

आशाताई बच्छाव

IMG-20220727-WA0035.jpg

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे् यांच्या वाढदिवसानिमित्त निष्ठा रॅली.

कोल्हापूर राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क: राज्यभरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. कोल्हापूर शहरातील शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रॅली काढून त्यांना शुभेच्छा दिल्या. या निष्ठा रॅलीत शिवसैनिकाबरोबरच महिला शिवसैनिकांचाही सहभाग मोठा होता.
. शिवसेना आणि शिवसेना बंडखोर गट यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी सुरू आहे. शिवसेना पक्षातील राजकीय उलथापालथी नंतर सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस राज्यभरात शिवसेनेत साजरा केला आहे. कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निष्ठा रॅली काढून शुभेच्छा दिल्या. शहर शिवसेना प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौक येथून ढोल ताशाच्या गजरात या निष्ठा रॅलीला सुरुवात झाली. शहर आणि उपनगरातील शिवसैनिक सहभागी झाले होते. या रॅली दरम्यान महिला शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी हिमालय प्रमाणे उभे राहणार असून तीन लाख सभासद नोंदणी करून त्यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले.
. या निष्ठा रॅलीत उद्धव ठाकरे यांचा विजय असो उद्धवजी आप आगे बढो अशा घोषणा देण्यात आल्या. फोर्ड कॉर्नर,उमा टॉकीज, तालीम मंडळ,मिरजकर तीकटी ,बिन खांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, पान लाईन मार्गे या रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली. सुनील मोदी, अभिषेक देवणे, राजू यादव, रंजीत आयरेकर, अभी बुकशेट, तेजस्विनी इंगवले यांच्यासह उपनगरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमनसे तफै पो,नि, गाड़े यांना निवेदन मुली ची छेड़ काढण्यावर कारवाई होणे,अपेक्षित
Next articleमाजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांचे लिंगमपली गांवात जीवनावश्यक वस्तु वाटप
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here