Home भंडारा मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश व ओबीसी आरक्षण याबाबतीत माजी खासदार...

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश व ओबीसी आरक्षण याबाबतीत माजी खासदार खुशाल बोपचे यांच्याशी पत्रकार संजीव भांबोरे यांनी लाखांदूर येथे केली चर्चा

92
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231016-065545_WhatsApp.jpg

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश व ओबीसी आरक्षण याबाबतीत माजी खासदार खुशाल बोपचे यांच्याशी पत्रकार संजीव भांबोरे यांनी लाखांदूर येथे केली चर्चा

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )भंडारा गोंदिया लोकसभेचे माजी खासदार तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष खुशाल बोपचे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथील पक्ष प्रवेशा बाबत भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील अखिल खेडूले
कुणबी समाज सभागृहात राष्ट्रीय ओबीसी बहुजन समाजाच्या लाखांदूर येथील सभेत पत्रकार संजीव भांबोरे यांनी माजी खासदार खुशाल बोपचे यांना प्रश्न उपस्थित करून आपण प्रफुल पटेल यांची साथ सोडून शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षात आपण प्रवेश केलेला आहे असा प्रश्न उपस्थित केला असता माजी खासदार खुशाल बोपचे म्हणाले की ,आपला गैरसमज झालेला असून शरदचंद्रजी पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि तेव्हापासूनच मी त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे मी त्यांच्यामध्ये सामील झालो हे म्हणणे उचित नाही .याउलट प्रफुल पटेल ,अजितदादा पवार यांनी गटबाजी करून ते पक्षाच्या बाहेर पडले. त्यामुळे मी पक्ष सोडला असे म्हणणे उचित होणार नाही .उलट त्यांनीच पक्ष सोडला .मी मुंबईत यशवंत प्रतिष्ठान मध्ये स्वतःचा मुलगा राजकारणात आल्यामुळे त्यांची औपचारिक भेट करून देणे उचित होते .म्हणून मी त्यांच्यासोबत भेट घेतली. असे ते सदर प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले .त्याचप्रमाणे सदर प्रतिनिधी यांनी मराठा समाज संख्येने कमी असताना आरक्षण मिळावे याकरिता त्या समाजामध्ये एकजूटता दिसून येते. परंतु आपला ओबीसी समाज या भारतामध्ये बहुसंख्येने असताना सुद्धा समाजाची एकजूटता दिसून येत नाही यावर सुद्धा पत्रकार संजीव भांबोरे यांनी प्रश्न उपस्थित केला असता खासदार खुशाल बोपचे म्हणाले की ,भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण दिलेली आहे .त्यामुळे सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे त्यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .यावेळी गणेश पारधी, पत्रकार कुलदीप गंधे, डॉ मुकेश पुडके ,सुरेश लंजे, मोरेश्वर तारेकर ,रामचंद्र राऊत वामनराव झाडे गंगाधर ठाकरे टोलीराम बागडे यादव कावळे अशोक दुपारे ,विनायक हाडगे, दामोदर जांभुळकर, देवराव कापगते, रामकृष्ण पारधी ,गजानन कोटरंगे, मनोहर ढोरे, गोपीचंद भुरले ,हनेराज उरकुडे पांडुरंग पुस्तोडे ,दिलीप मेश्राम अशोक लांडगे, बाळकृष्ण ठाकरे, उदाराम ठाकरे, दयाराम तोंडरे श्रीधर महाजन , वसंत झाडे दिलीप ब्राह्मणकर, दयानंद कुथे ,सुरेश भुते, खेमचंद राऊत, मोतीराम मेश्राम, मानक नाईक ,मुरलीधर तोंडरे ,कैलास देशमुख ,दयानंद कुथे, प्रभू गहाणे, कैलास देशमुख ,मनोहर भानारकर, व मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here