Home भंडारा भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील साखर कारखाना 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान सुरू...

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील साखर कारखाना 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान सुरू होणार

111
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231016-065028_WhatsApp.jpg

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील साखर कारखाना 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान सुरू होणार

पत्रकार संजीव भांबोरे यांनी मुख्य कृषी अधिकारी नरेंद्र चौधरी यांच्याशी केली चर्चा

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे नॅचरल ग्रोवर्स प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 दरम्यान सुरू होणार असल्याचे नरेंद्र चौधरी मुख्य कृषी अधिकारी नॅचरल ग्रोवर्स प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना, लाखांदूर यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांच्याशी मुलाखती दरम्यान चर्चा करताना सांगितले. लाखांदूर येथे सुरू होणारा साखर कारखाना हा शेतकऱ्यांकरता वरदान ठरणार असून रोजगाराचे साधन सुद्धा बेरोजगारांकरता मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. लाखांदूर येथून आपल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केले असून शेतकऱ्यांनी,ऊस भरपूर लावा. शेतकऱ्यांना ही एक सुवर्णसंधी आलेली आहे .कारखान्या मार्फत देण्याची व्यवस्था केलेली आहे. शेतकऱ्यांना विनंती अशी राहील की, आपल्याला उत्पन्न भरपूर मिळेल .साखर कारखान्याचा उतारा चांगला येईल म्हणून 92005 आणि 86032 या दोन जातीची जास्तीत जास्त लागवड करावी. कारखान्यामार्फत देण्याची व्यवस्था ,आपल्या शेतापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ऊस लागवडी करता आपल्याला उसाचे उत्पन्न जास्त मिळाले पाहिजे याकरता मार्गदर्शनाची व्यवस्था केलेली आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लावावा आपल्या लाखांदूर आणि पवनी तालुक्यांमध्ये सध्या ऊस कमी आहे म्हणून यावर्षी साकोली ,सडक अर्जुनी ,मोरगाव अर्जुनी ,या भागात उपलब्ध उसावर हा कारखाना यावर्षी हजार टणाचे गाळप करणार आहे. व पुढच्या हंगामाला या कारखान्याचे 1200 टनाची क्षमता होऊन लाखांदूर, पवनी या तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ऊस लागवडी करता संमती दिलेली आहे .तरी आपल्या सर्व शेतकऱ्यांना साखर कारखानाच्या मार्फत मुख्य कृषी अधिकारी नरेंद्र चौधरी विनंती केली असून भरपूर जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये आपणच लागवड करावी हा कारखाना 25 ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये चालू होणार आहे या कारखान्याला जवळजवळ प्रत्यक्षपणे 450 रोजगार व अप्रत्यक्ष ४ ते साडेचार हजार रोजगार कामाला लागतील . व लाखांदूर, पवनी ,साकोली सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी या भागातील सर्व शेतकऱ्यांच विकास होईल होणार असल्याचे मुख्य कृषी अधिकारी नरेंद्र चौधरी यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांच्याशी मुलाखती दरम्यान बोलताना सांगितले. यावेळी पत्रकार कुलदीप गंधे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here