Home भंडारा तुमसर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवा :- पोलीस अधीक्षक लोहीत मतानी

तुमसर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवा :- पोलीस अधीक्षक लोहीत मतानी

34
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231016-064003_WhatsApp.jpg

तुमसर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवा :- पोलीस अधीक्षक लोहीत मतानी

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)-तुमसर शहरातील अवैध पार्किंग, अवैध वसुली, सुरक्षा , गुन्हेगारी, यावर आळा घालण्यासाठी कायद्याचा आधार घेऊन समाजात व शहरातील
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तुमसर शहरातील नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करावे .व पोलीसांनी सुध्दा नागरीकांना सहकार्य करावे असे आवाहन भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांनी तुमसर शहरातील नगर परिषद सभागृहात आयोजित व्यापारी बांधवांच्या सभेत केले

त्यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी आय पी एस रश्मिता राव नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम,,पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे, उपस्थित होते.

सदर बैठकीत शहरातील व्यापाऱ्यांनी शिवाजी नगर गंज बाजारपेठेत असलेल्या तुमसरेश्वर महागणपती मंदिरासमोरील अतिक्रमण, शहरातील छोटे व अरुंद रस्ते व त्याबाबत तक्रारी केल्या.श्रीराम नगर, इंदिरा व विनोबा नगरकडे जाणारा भंडारा कडे जाणारा मुख्य रस्ता, मंदिराजवळील सट्टा लाईनवर पसरलेले अतिक्रमण व दुभाजक बांधण्याबाबत तसेच प्रत्येक भुयारी मार्गाच्या तोंडावर दुभाजक व दुभाजक उघडे ठेवण्यात आले असून त्यामुळे मोठे अपघात होत आहेत. या चर्चेला उत्तर देताना मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी तुमसरेश्वर महागणपती मंदिरासमोरील अतिक्रमण काढणे, पथारी व्यावसायिकांचे स्थलांतर आदींबाबत कलम १७९ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.रश्मिता राव यांनी व्यापाऱ्यांना भयमुक्त वातावरणात व्यवसाय करण्याबाबत तसेच वाहतूक नियंत्रणासाठी नवीन टीम तयार करण्याबाबत माहिती दिली.
चर्चेच्या सुरुवातीला बांबूपासून बनवलेले साहित्य विकणाऱ्या मनोरमा डोंगरे यांनी तुमसरेश्वर महागणपती मंदिराच्या परिसरात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती मांडली. पोलीस अधिक्षक मतानी म्हणाले, अल्पवयीन मुले गाडी चालवताना पकडली गेल्यास त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल केला जाईल. जिल्हा वाहतूक निरीक्षक यांना हे आदेश देण्यात आले आहेत.या सभेला बहुसंख्येने व्यापारी वर्ग उपस्थित होते तर सभेचे संचालन प्राचार्य प्रा.राहुल डोंगरे यांनी केले.तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मण यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here