Home नांदेड मुखेड तालुक्यातील 128 ग्रामपंचायती पैकी 6 ग्रामपंचायत बिनविरोध तर 102 ग्रामपंचायतीतील 131...

मुखेड तालुक्यातील 128 ग्रामपंचायती पैकी 6 ग्रामपंचायत बिनविरोध तर 102 ग्रामपंचायतीतील 131 वार्डात निवडणूक लढत रंगणार..

243

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील 128 ग्रामपंचायती पैकी 6 ग्रामपंचायत बिनविरोध तर 102 ग्रामपंचायतीतील 131 वार्डात निवडणूक लढत रंगणार..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील नोव्हेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या 108 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी तहसील परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी 4 जानेवारी रोजी दुपारी वेळ 3 वाजेपर्यंत होती. निर्धारित दिलेल्या कालावधीत तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीमध्ये18 वॉर्डातील 37 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात कोळनुर भगनुरवाडी हसनाळ ( प .दे.) जांब खुर्द कमळेवाडी ईटग्याळ ( प. दे.) अशा एकूण सहा ग्रामपंचायतीचा समावेश आहे उर्वरित 102 ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी सुरू झाली असून त्यातील 131 वार्डात प्रत्यक्ष निवडणूक रंगणार आहे.

Previous articleयोग विद्या धाम नांदेड शाखेच्या सण २०२१ च्या दिनदर्शिकेचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते विमोचन
Next articleअस्तगाव च्या आठवडे बाजारात तुफान हाणामारी! 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.