Home नांदेड योग विद्या धाम नांदेड शाखेच्या सण २०२१ च्या दिनदर्शिकेचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन...

योग विद्या धाम नांदेड शाखेच्या सण २०२१ च्या दिनदर्शिकेचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते विमोचन

98
0

राजेंद्र पाटील राऊत

योग विद्या धाम नांदेड शाखेच्या सण २०२१ च्या दिनदर्शिकेचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते विमोचन

नांदेड,दि. ६ राजेश एन भांगे
भारतीय योग विद्या धाम नांदेड यांच्यावतीने दिनदर्शिकचे विमोचन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज करण्यात आले. या प्रसंगी नायब तहसिलदार सुनिल माचेवाड तसेच भारतीय योग विद्याधामचे पदाधिकारी सचिव एम. डी. नल्लावार, अध्यक्ष एन. डी. पोलारकर, उपाध्यक्ष रमेश केंद्र यांची उपस्थिती होती.

योग विद्या धाम नांदेड शाखेच्या वतीने कोरोना लॉकडाऊन काळात व्यापक प्रमाणात आरोग्याबाबत जनजागृती व योग प्रसाराला चालना दिली. त्यांनी जनतेच्या मनात निर्माण केलेला विश्वासाचा गौरव जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी केला.
प्रत्येक वर्षी सेवाभाव वृत्तीने दिनदर्शिका प्रकाशीत होत असते. तसेच योग वर्ग दररोज शहरात घेतले जातात. कामगार कल्याण केंद्र नांदेड येथे मुख्य कार्यालय असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here