Home कोल्हापूर हातकणंगले तालुका फोटो, व्हिडीओग्राफर असोसिएशन अध्यक्ष,उपाध्यक्ष बिनविरोध निवड

हातकणंगले तालुका फोटो, व्हिडीओग्राफर असोसिएशन अध्यक्ष,उपाध्यक्ष बिनविरोध निवड

130
0

राजेंद्र पाटील राऊत

हातकणंगले तालुका फोटो, व्हिडीओग्राफर असोसिएशन अध्यक्ष,उपाध्यक्ष बिनविरोध निवड

नवे पारगाव: हातकणंगले तालुका फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर असोसिएशन च्या अध्यक्षपदी तळसंदे येथील ग्रामपंचायत सदस्य महेश शिवाजीराव कुंभार तर उपाध्यक्षपदी बजरंग भिमराव पाटील (लाटवडे) यांची बिनविरोध निवड झाली.
नूतन वर्षाच्या प्रारंभी कार्यकारणी नियुक्त करण्यात आली.तसेच सचिवपदी सलीम मुल्लाणी (मौजे तासगाव) व खजिनदारपदी सनी लोखंडे (पुलाची शिरोली) यांचीही यावेळी नियुक्ती करण्यात आली. .
फोटोग्राफर बंधूच्या न्याय व हक्कासाठी आम्ही शासन दरबारी प्रामाणिक पणे प्रश्न मांडणार असून अडी अडचणी सोडविण्याचे शिवधनुष्य आम्ही उचलणार आहोत असे मत ,नूतन अध्यक्ष महेश कुंभार यांनी व्यक्त केले.या निवडीसाठी .संजय नांगरे यांनी सूचक म्हणून तर यावेळी मावळते अध्यक्ष श्री.सुनील माने (इचलकरंजी ) यांनी या निवडीस अनुमोदन दिले. याप्रसंगी,श्री.अशोक वाघमोडे ,श्री.रणजीतसिंह पाटील, श्री.फिरोज मुजावर श्री.केशव शिंदे ,श्री.जयदीप किनिंगे ,श्री.विवेक किनिंगे सौ.आयेशा पकाले ,सौ.रुपाली कोळी,सौ.पल्लवी व्हनुग्रे आदि संचालक उपस्थित होते.सचिव श्री.सलीम मुल्लाणी यांनी आभार मानले.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleकोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस , नागरिकांनी स्वेटर ऐवजी रेनकोट परिधान
Next articleयोग विद्या धाम नांदेड शाखेच्या सण २०२१ च्या दिनदर्शिकेचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते विमोचन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here