Home भंडारा दिव्यांगांसाठी उपयुक्त पुस्तिकेचे बच्चू कडू यांच्या हस्ते प्रकाशन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची...

दिव्यांगांसाठी उपयुक्त पुस्तिकेचे बच्चू कडू यांच्या हस्ते प्रकाशन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची निर्मिती

24
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231016-070024_WhatsApp.jpg

दिव्यांगांसाठी उपयुक्त पुस्तिकेचे बच्चू कडू यांच्या हस्ते प्रकाशन
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची निर्मिती

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या आज झालेल्या जिल्हास्तरीय भव्यदिव्य कार्यक्रमात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र,जिल्हा रुग्णालय, भंडारा यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्ती अधिनियम व दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या असलेल्या विविध कल्याणकारी योजना व सवलतींची विस्तृत माहिती असलेल्या पुस्तिकेचे विमोचन दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले.
या पुस्तकामध्ये दिव्यांग व्यक्ती अधिनियम, दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रात असलेल्या नऊ राष्ट्रीय संस्था, स्वावलंबन कार्डासाठी लागणारी माहिती, दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजना, शैक्षणिक आणि पुनर्वसन योजना, सेवा व सुविधा, महत्त्वाचे दिवस आणि कार्यक्रम खाजगी अनुदानित दिव्यांग शाळा ,कर्मशाळा ,आणि दिव्यांग कल्याण अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती आहे. तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा 2016 ची वैशिष्ट्ये व विस्तृत माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे. या पुस्तिकेची निर्मिती अभिजीत राऊत व त्यांच्या चमूने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here