Home बुलढाणा गुरांचा गोठा भ्रष्टाचार प्रकरणात संग्रामपूर पंचायत समिती समोर राष्ट्रगीताने सुरुवात झालेल्या उपोषणाचा...

गुरांचा गोठा भ्रष्टाचार प्रकरणात संग्रामपूर पंचायत समिती समोर राष्ट्रगीताने सुरुवात झालेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस!

282
0

आशाताई बच्छाव

IMG-20231005-WA0001.jpg

गुरांचा गोठा भ्रष्टाचार प्रकरणात संग्रामपूर पंचायत समिती समोर राष्ट्रगीताने सुरुवात झालेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस!

ग्रा.पं.काकनवाडा खुर्द च्या भ्रष्टाचारा विरोधात मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकवटले

(ज्ञानेश्वर पाटील दांदळे ब्युरो चीफ बुलढाणा)-
संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा खुर्द येथील तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर दयाराम अढाव व गावातील इतर नागरिक, यांनी दिनांक ४ सप्टेंबर रोजी संग्रामपूर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते की ग्रामपंचायत काकणवाडा खुर्द. येथील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी शासनाची व ग्रामस्थांची दिशाभूल करून स्वतः सरपंच गोपाल दयाराम अढाव व त्यांचे भाऊ गोविंदा दयाराम अढाव यांनी महात्मा गांधी ग्रामरोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेचा लाभ सर्व नियम व अटी धाब्यावर बसवून घेतला असुन
या दोन्ही लाभार्थ्यांकडे नियमानुसार कोणतेही गुरे ढोरे व वृक्ष लागवड केलेली नसतांना तसेच शासनाच्या निकषानुसार पात्र नसतांना ग्रामसेवकांच्या संगनमताने लाभ देण्यात आला. तसेच पंचायत समिती कार्यालयातील संबंधित विभागाने कोणतीही चौकशी न करता शासनाची दिशाभूल केली अशा
सर्व भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करुण दोषींवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम १४ छ नुसार कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली.परंतु संबंधित विभागाकडून कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने अखेर पुन्हा दिनांक 20 सप्टेंबर2023 रोजी दिलेल्या तक्रार निवेदनात पारदर्शक चौकशीची व कार्यवाहीची मागणी तक्रारदार नागरिकांनी केली होती. तरीसुद्धा आज पावतो पंचायत समिती विभाग कुंभकर्णी झोपेतून जागे न झाल्याने अखेर तक्रारदार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्या प्रमाणे 3 ऑक्टोंबर 2023 रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती संग्रामपूर यांच्या कार्यालयासमोर तक्रारदार नंदकिशोर अढाव व गावातील इतर अंदाजे शेकडो नागरिक आमरण उपोषणाला बसले असुन उपोषणाची सुरुवात ही राष्ट्रगीताने करण्यात आली.
यावेळी उपोषण मंडपाला संग्रामपूर तालुक्यासह जळगाव जामोद मतदारसंघातील विविध पक्षाच्या नेते मंडळीने तसेच शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा भेट दिली व उपोषणकर्त्या बहुसंख्य नागरिकांसोबत सविस्तर विषयावर चर्चा करून गट विकास अधिकारी यांना झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती दिली व कारवाई करण्याची मागणी केली यावेळी (उ.बा.ठा.) शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश सचिव स्वातीताई वाकेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष अरुणभाऊ निंबोळकार, यांचे सह इतर सर्व उपस्थितांनी उपोषणाला पूर्णपणे पाठिंबा दिला. आणि गटविकास अधिकारी यांनी आपल्याच विभागाची सावरा सावर करत भ्रष्टाचार झालेला असल्यास चौकशी करून दोशींवर कार्यवाही करण्यात येईल अशे सांगितले. त्यावर दुसऱ्या दिवशी सुद्धा विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन गट विकास अधिकारी यांच्या दालनात जाऊन प्रसन्नजीत पाटील राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस, संजय उमरकर काँग्रेस तालुकाध्यक्ष जळगाव जामोद यांनी चर्चा केली परंतु व्हिडिओ यांच्या उर्मट वागणुकी मुळे उपोषणकर त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला नसून बिडिओ यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली असून उपोषणकर्त्यांनी मात्र तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही होईपर्यंत उपोषण सोडणार नाही अशा निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. या उपोषणाला काकनवाडा खुर्द येथील शेतकरी नागरिकांची एवढ्या मोठ्या संख्येची उपस्थिती पाहता उपोषणकर्त्यांच्या मागणीचे निराकरण करणे गरजेचे असल्याचे दिसून येते.

◼️विशेष म्हणजे पंचायत समिती समोर तीन आक्टोंबर रोजी चालू झालेल्या उपोषणाला पहिल्याच दिवशी शेकडो नागरिकांनी हजेरी लावली आणि दुसरा दिवस उगवून सुद्धा कार्यवाही मात्र शून्य त्यामुळे उपोषण लांबल्यास यापेक्षाही मोठ्या संख्येने नागरिक उपोषण मंडपात बसण्यास येतील असे उपस्थित नागरिकांकडून बोलल्या जात होते.

♦️पंचायत समिती कार्यालयासमोर चालू असलेल्या उपोषणा संदर्भात दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी चर्चा करणे कामी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात गेल्यानंतर बिडिओ यांनी अर्वाच्य भाषेत सर्वांना बाहेर जा असे म्हणताच शेतकरी संघटनेसह उपस्थित राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी गट विकास अधिकारी यांना कायद्याच्या चौकटीत राहून नागरिकांशी संवाद साधा अशी कान उघडणी करताचं बिडिओ यांनी स्वतःची चूक झाल्याचे मान्य करत सर्वांना कार्यालयात बसण्याची विनंती करून चर्चा केली. त्यावर दुसऱ्या दिवशी सुद्धा बिडिओ यांच्याकडून चालू असल्या उपोषणा संदर्भात कुठलाही सकारात्मक निर्णय घेण्यात आला नसून बिडिओ यांची भूमिका मात्र “मेरी मुर्गी एकही टांग”अशी होती.

🔻 संग्रामपूर पंचायत समितीचे बिडिओ माधव पायघन यांनी कायदा टांगला खुटीला…
असे चित्र पाहावयास मिळत आहे सामान्य नागरिक असो की राजकीय पुढारी असो बिडिओ पंचायत समिती अंतर्गत चालू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना बिडिओ हे आपल्या दालनातून बाहेरचा रस्ता दाखवतात.. अन्यथा पोलीस बोलावेल म्हणजे एकंदरीत गुन्हे दाखल करणार.. अशी बेशिस्त वागणूक देतांना दिसून येत आहेत. आणि या सर्व घटनेची सत्यता जाणून घेण्यास पत्रकार हे त्यांच्या दालनात गेल्यास त्यांना सुद्धा आपला मोबाईल खालच्या खिशात ठेवा किंवा बाहेर निघून जा अशाप्रकारे कायदा हातात घेऊन गैरकृत्य करताना नव्याने आलेले गटविकास अधिकारी हे दिसतात. वास्तविक पाहता भारतीय मीडियाला भारतीय लोकतंत्र्याचा चौथा स्तंभ मानला जातो आणि या ठिकाणी मात्र बिडिओ हे आपल्या कार्यालयीन भ्रष्ट कारभार उघडकीस येऊ नये म्हणून पत्रकारांना त्यांच्या दानातून बाहेर काढण्याचा किंवा त्यांचे मोबाईल बंद ठेवण्याकरिता दम देण्याचा प्रयत्न करतात. अशी गुंड प्रवृत्तीची वागणूक देणाऱ्या बिडीओची हुकुमशाही तालुक्यातील नागरिक खपवून घेणार नाहीत.
युवा मराठा महासंघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here