Home भंडारा सीएलसी येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

सीएलसी येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

37
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231006-065100_WhatsApp.jpg

सीएलसी येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) -येथील नगर परिषदे अंतर्गत येणाऱ्या दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान, स्वानंदी शहरस्तर संघ (सीएलएफ) आधार शहर उपजिवीका केंद्र (सीएलसी) यांच्या संयुक्त विद्यमाने अहिंसेच्या मार्गावर चालण्याकरिता ज्यांनी अवघ्या जगाला प्रेरित केले असे राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारतीय सैनिक व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतत लढा देणारे, शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती सीएलसी केंद्र भंडारा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण पडोळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापक‌ प्रकाश बांते, स्वानंदी महिला विकास संस्थेच्या अध्यक्ष रंजना साखरकर, नगर परिषदेच्या समुदाय संघटन उषा लांजेवार, रेखा आगलावे, सीएलसी व्यवस्थापक गुरूदास शेंडे, गांधी विचार मंचाचे विलास केजरकर, न.प. मल्टीटास्क सहाय्यक शोभा साखरकर, सीएलसी अध्यक्ष समिता भंडारी, सुनंदा कुंभलकर व नगर परिषदच्या सीआरपी उपस्थित होत्या.
त्यावेळी प्रत्येक मानव हा आपल्या वर्तमानातील कार्यामुळे आपले भविष्य ठरवत असतो. जर सकारात्मक भूमिकेतून पाऊल उचलले तर निश्चितच यश हे मिळणार आहे. आणि जग हे अहिंसेच्या मार्गानेच जिंकता येतो असे बहुमोलाचे विचार तथा सत्य, अहिंसा आणि सहिष्णुता यांची शिकवण जगाला देणारे महात्मा गांधी. तसेच या देशाचे खऱ्या अर्थाने दोनच पोशिंदे आहेत ते म्हणजे देश सेवा करणारे सैनिक व जे रक्ताचे पाणी करत शेतात राबणारे शेतकरी बांधव हेच खऱ्या अर्थाने आपल्या देशाचे हिरो आहेत. म्हणूनच लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान-जय किसान’ हा नारा दिला होता. म्हणून महिलांनी त्यांच्यापासुन प्रेरणा घेऊन आपले कार्य अविरत करावे असे प्रतिपादन नगर परिषदेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण पडोळे यांनी केले.
तसेच उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जिवन चरित्र्यावर विविध उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सीमा साखरकर व प्रास्ताविक गुरूदेव शेन्डे
यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रियंका सेलोकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नगर परिषदेच्या सीएलसी व सर्व सीआरपींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here