Home अकोला शिवसेना आमदाराच्या बायकोने केली नवरा हरवला असल्याची दाखलतक्रार

शिवसेना आमदाराच्या बायकोने केली नवरा हरवला असल्याची दाखलतक्रार

51
0

आशाताई बच्छाव

IMG-20220621-WA0029.jpg

अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): बाळापूर मतदारसंघातील शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने अकोला पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. कालपासून माझे पती बेपत्ता असून त्यांना लवकर शोधावे, असे प्रांजल देशमुख यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजल देशमुख यांनी सिव्हिल लाईन अकोला पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, काल संध्याकाळी सहा वाजता माझे त्यांच्याशी शेवटचे बोलणे झाले. मी थोड्याचवेळात मुंबईहून अकोल्याला येण्यासाठी निघेन, असे त्यांनी मला फोनवर सांगितले.

सात वाजल्यपासून त्यांचा फोन बंद आहे. त्यांचा पीए आणि सहकारी स्टेशनवर त्यांची वाट बघत होते. मात्र, ते विधानभवनातून परत आलेच नाहीत. कालपासून माझा त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही.

त्यामुळे मी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. आता पोलिसांनी त्यांना तातडीने शोधावे, असे प्रांजल देशमुख यांनी सांगितले. नितीन देशमुख यांच्या पत्नीच्या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Previous articleगुरांचा बाजार हा जेथे होता तेथेच ठेवा अन्यथा आंदोलनाचा इशारा
Next articleपंचायत समिती नांदगाव येथे योग दिन साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here