Home बुलढाणा गुरांचा बाजार हा जेथे होता तेथेच ठेवा अन्यथा आंदोलनाचा इशारा

गुरांचा बाजार हा जेथे होता तेथेच ठेवा अन्यथा आंदोलनाचा इशारा

34
0

आशाताई बच्छाव

IMG-20220621-WA0018.jpg

गुरांचा बाजार हा जेथे होता तेथेच ठेवा अन्यथा आंदोलनाचा इशारा
संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

आज 21/06/2022 रोज मंगळवार रोजी मा. जिल्हाधिकारी / तहसिलदार तालुका संग्रामपुर, जिल्हा बुलढाणा मार्फत वरवट बकाल येथील गुरांचा बाजार हा संग्रामपुर येथे न भरणे बाबत येथील असंख्य गावकरी लोकांनी संग्रामपूर येथे निवेदन दाखल केले आहे
सदर बाजार हा आजवर शनिवारी वरवट बकाल येथे भरत असतो. पण दिनांक 18/06/2022 च्या प्राप्त माहिती नुसार सदर गुरांचा बाजार हा संग्रामपुर येथे स्थलांतर करण्याची माहिती गावातील लोकांच्या कानी पडताच या विषयावर सर्व गावात चर्चा सुरू झाली या बाजारच्या भरवश्यावर वरवट बकाल येथील व तालुक्यातील बऱ्यापैकी अतिरिक्त खेडेपाडे वरील लोकांची उपजीवेकेचे साधन आहे. सदर बाजारावरच अनेक छोटे मोठे व्यवसाय सुद्धा अवलंबून आहेत.
वरवट बकाल हे गाव संग्रामपुर तालुक्यात मध्यस्थि असणारे ठिकाण असून सर्व शेतकरी व गुरे खरेदी विक्री करणारे व्यापारी यांच्या सोयीचे आहे, त्याचप्रमाणे स्थानिक इतर व्यवसाहिकांना सुद्धा हा शनिवार गुरांचा बाजार खुप मोठा लाभदायक आहे तरी हा गुरांचा बाजार संग्रामपुर येथे स्थलांतर न करता वरवट बकाल येथेच भरविण्यात यावा त्याचप्रमाणे पावसाळ्यात बाजारात होणाऱ्या चिखलाच्या गैरसोयीची अंबलजवणी करण्यात यावी
गुरांचा बाजार वरवट बकाल येथेच भरण्यात यावा, जर हा गुरांचा बाजार इतर कोणत्याही ठिकाणी स्थलांतर झाला तर लोकशाही मार्गाने समस्त वरवट वासीयांकडून तहसील कार्यालय संग्रामपुर येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमुद केले आहे
निवेदनाच्या प्रतीत मा.आमदार साहेब, गटविकास अधिकारी संग्रामपूर,प्रशासक/सचीव तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती संग्रामपूर हे असुन सदर निवेदन वरवट बकाल येथील पंकज इंगळे,तोसिफ जमदार,सुनील मिसाळ,अंकुश कोकाटे तसेच असंख्य वरवट ग्रामस्थ सह्यानिशी उपस्थित होते..

Previous articleआंतर राष्ट्रीय योग दिन साजरा कला व वाणिज्य वरवट बकाल
Next articleशिवसेना आमदाराच्या बायकोने केली नवरा हरवला असल्याची दाखलतक्रार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here