Home बुलढाणा आंतर राष्ट्रीय योग दिन साजरा कला व वाणिज्य वरवट बकाल

आंतर राष्ट्रीय योग दिन साजरा कला व वाणिज्य वरवट बकाल

116

आशाताई बच्छाव

IMG-20220621-WA0027.jpg

आंतर राष्ट्रीय योग दिन साजरा
कला व वाणिज्य वरवट बकाल                            संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार शहर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथे NCC व NSS तसेच शारीरिक शिक्षण यांच्या विभागा द्वारा जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले आज दिनांक २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
आज आंतरराष्ट्रीय दिनाच्या पहाटे सकाळी ६:०० वाजता महाविद्यालयाचे प्रांगणावर एकलारा येथील श्री. भास्कर भोंडे व श्री. कैलास भोंडे या योग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे दिले.
सुरुवातीला लेफ्टनंट निशिगंध सातव यांनी योग दिनाचे महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.
मुख्य योग शिक्षक श्री. कैलास भोंडे यांनी सर्वांनी योग का करावा याविषयी अत्यंत मोलाची माहिती दिली.
श्री. भास्कर भोंडे यांनी विविध योगासने प्रात्यक्षिकासह सादर केली.
या प्रसंगी एन सी सी, क्रीडा विभाग व एन एस एस चे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
लेफ्टनंट निशिगंध सातव, क्रीडा शिक्षक गजानन पैकट, व Nss अधिकारी प्रा. आनंद धुंदाले, श्री. भारत करांगळे, प्रा. विजयानंद इंगळे, प्रा. सतिश राणे, प्रा. किशोर ठेंग, श्री. सुधाकर वानेरे व श्री. दयाराम इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleवाढदिवसातून सामाजिक कार्य एक अनमोल कार्य
Next articleगुरांचा बाजार हा जेथे होता तेथेच ठेवा अन्यथा आंदोलनाचा इशारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.