Home नाशिक गणेश विसर्जनाच्या दिवशी नाशिकमध्ये तीन घटनांमध्ये पाच तरुण बुडाले

गणेश विसर्जनाच्या दिवशी नाशिकमध्ये तीन घटनांमध्ये पाच तरुण बुडाले

193

आशाताई बच्छाव

Screenshot_20230929-100838_Google.jpg

गणेश विसर्जनाच्या दिवशी नाशिकमध्ये तीन घटनांमध्ये पाच तरुण बुडाले                               नाशिक,(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ) 

गणेश विसर्जनाच्या दिवशी नाशिकमध्ये तीन वेगवेगळ्या घटनेत पाच तरुण बुडाले आहेत. चेहेडी संगमेश्वर परिसरात एक महाविद्यालयीत तरुण बुडाला आहे. पंचवटीत गाडगे महाराज पुलाखाली बुडालेल्या दोघांचा शोध सुरू आहे.

गुरुवारी दिवसभरात वेगवेगळ्या तीन घटनेतील दोघांचे मृतदेह मिळाले असून इतर तिघांचा शोध सुरू आहे. शहरातील गोदावरी नदीत दोन आणि इगतपुरीतील वालदेवी धरणात दोन जण बुडाल्याची घटना समोर आली आहे.

अनंत चतुदर्शीनिमित्त गुरुवारी सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकी मोठ्या उत्साहात सुरू होत्या. मात्र विसर्जन मिरवणुकीनंतर विसर्जनादरम्यान गालबोट लागल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडल्या आहेत. शहरातील रामकुंड परिसरातील गाडगे महाराज पुलाजवळील घाटावर दोन जण बुडाले. हे गणेश भक्त मूर्ती विसर्जनासाठी गेले होते. त्यांची शोधमोहीम अजूनही सुरूच आहे. दुसऱ्या एका घटनेत इगतपुरी तालुक्यातील वालदेवी धरणात दोन तरुण बुडाले आहेत. या दोघांचेही मृतदेह धरणातून बाहेर काढले आहेत. यंदा वालदेवी धरण परिसरात विसर्जनासाठी प्रशासनाने बंदी घातली होती, तरीही नागरिकांकडून मोठ्या संख्येने येथे जमून गणेश विसर्जन केले.

Previous articleस्लग नांदगाव शहरातील गणेश नगर भागातील अर्थवने बनवले श्रीराम मंदिर
Next articleचाळीसगाव येथे ईदमिलादुनबी उत्साहात साजरी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.