Home उतर महाराष्ट्र केबल चोरीच्या घटनेत वाढ श्रीरामवाडी परिसरातील चार ते पाच शेतकऱ्यांच्या केबलची चोरी

केबल चोरीच्या घटनेत वाढ श्रीरामवाडी परिसरातील चार ते पाच शेतकऱ्यांच्या केबलची चोरी

141
0

आशाताई बच्छाव

IMG-20231004-WA0031.jpg

केबल चोरीच्या घटनेत वाढ श्रीरामवाडी परिसरातील चार ते पाच शेतकऱ्यांच्या केबलची चोरी                 नेवासा,(कारभारी गव्हाणे प्रतिनिधी)

. सोनई जवळील श्रीरामवाडी परिसरातून चार ते पाच शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या केबल चोरीच्या घटना सातत्याने घडत असून त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या आधी सुद्धा या परिसरातुन केबल चोरीच्या घटना घडल्या आहेत मात्र यांचा एकाही चोरीचा तपास अद्याप लागलेला नसताना आता पुन्हा चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे पोलिसांनी याचा कसोशीने तपास लावावा अशी मागणी परिसरातुन करण्यात येत आहे वारंवार केबल चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी पुरता वैतागला आहे त्यातच बिबट्याच्या भीतीने शक्यतो रात्रीच्या वेळी कुणी शेतात जात नसल्याने याच संधीचा फायदा चोरा कडून उचला जात आहे या आधी सुद्धा श्रीरामवाडी आणि परिसरात बऱ्याचशा इलेक्ट्रिक मोटरच्या केबल चोरीच्या घटना घडलेल्या आहेतट गेल्या काही दिवसापूर्वी याच श्रीरामवाडी येथून घरासमोर लावलेला ट्रॅक्टर पळविण्याची घटना घडली होती सोनई पोलिसांनी सदर ट्रॅक्टरचा शोध लावला मात्र यातील आरोपीना मात्र अटक झाली नाही सोन‌ई परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने या भागातील शेतकरी शेतात जाण्यास घाबरतात वनविभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे

Previous articleगुरांचा गोठा भ्रष्टाचार प्रकरणात संग्रामपूर पंचायत समिती समोर राष्ट्रगीताने सुरुवात झालेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस!
Next articleचाळीसगाव तालुका संजय गांधी निराधार समिती जाहीर…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here