Home युवा मराठा विशेष मराठा समाज निगम मंडळाचे अध्यक्ष श्री मारुतराव मुळे यांची छत्रपती शिवाजी महाराज...

मराठा समाज निगम मंडळाचे अध्यक्ष श्री मारुतराव मुळे यांची छत्रपती शिवाजी महाराज सहकार बँकेस सदिच्छा भेट.

72
0

आशाताई बच्छाव

IMG-20220711-WA0012.jpg

मराठा समाज निगम मंडळाचे अध्यक्ष श्री मारुतराव मुळे यांची छत्रपती शिवाजी महाराज सहकार बँकेस सदिच्छा भेट.

गुलबर्गा जिल्हा प्रतिनिधी यशवंतराव सूर्यवंशी.
गुलबर्गा नगरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सहकार बँक गुलबर्गा येथील मराठा समाज निगम मंडळाचे अध्यक्ष श्री मारुतराव मुळे यांचा बँकेचे गौरव अध्यक्ष डॉ विनकर यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमात राज्याचे के के एम पी. चे उपाध्यक्ष श्री सूर्यकांत कदम, के के एम पी चे जिल्हा अध्यक्ष आर बि जगदाळे , सचिव श्री राजू काकडे माजी मराठा समाज अध्यक्ष श्री सुभाष जाधव, के के एम पी चे युवा अध्यक्ष श्री भीमराज वाघमारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मंडळाचे अध्यक्ष श्री मारुतराव मुळे यांनी आपले स्थान ग्रहण केल्या नंतर आपल्या वक्तव्यातून त्यांनी बंगळूर येथील पॅलेस मैदानात दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मराठा समाजाचे निगम मंडळाचे कचेरी उद्घाटनासाठी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान बसवराज बोम्मइ व तसेच मंत्रिमंडळातील अनेक मंत्री या कार्यक्रमात उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात गुलबर्गा जिल्ह्यातून समस्त मराठा समाजातील बंधू भगिनी याना आवर्जून उपस्थित राहण्यास आवाहन केले, ह्या निगम मंडळास कर्नाटक राज्याकडून सुमारे 50 कोटी रुपये समाजाच्या प्रगतीसाठी व अनेक योजने साठी हे अनुदान देण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमात मराठा समाजाचे नेते श्रीमान जोतिबा भिसे, व्यंकटेश माने , प्रताप काकडे, सहदेव भोसले, कैलास मोरे, यशवंतराव सूर्यवंशी ,राजू वाडेकर, श्रीकांत जाधव , अनिल मोरे, सुधीर पाटील- मडकी ,दत्तात्रेय जाधव, संतोष जाधव, दत्ता काळे, रमेश चिंचकोट आदी प्रमुख नेते ह्या कार्यक्रमात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here