Home गडचिरोली डॉक्टरांच्या निष्काळजीपनामुळे दोन वर्षीय बालकाचा महिला रुग्णालयात मृत्यु……. डॉक्टरावर गुन्हा दाखल करुन...

डॉक्टरांच्या निष्काळजीपनामुळे दोन वर्षीय बालकाचा महिला रुग्णालयात मृत्यु……. डॉक्टरावर गुन्हा दाखल करुन निलबिंत करा पालकासह परिवाराची मागणी

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220713-WA0073.jpg

डॉक्टरांच्या निष्काळजीपनामुळे दोन वर्षीय बालकाचा महिला रुग्णालयात मृत्यु…….

डॉक्टरावर गुन्हा दाखल करुन निलबिंत करा पालकासह परिवाराची मागणी

गडचिरोली महिला रुग्नालयातिल प्रकार मा. खासदारानी घेतली दखल

सावली/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे एका दोन वर्षीय बालकांचा गडचिरोलीच्या महीला रूग्णालयात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली पार्थ आशीष प्रधाने २ वर्ष असे मृत बालकाचे नाव असून तो सावली येथील रहिवाशी होता. आज रोजी अचानक दोन वर्षीय पार्थ ची प्रकृति बिघडल्याने त्याला उपचारार्थ गडचिरोली येथील महिला रुग्णालयात भर्ती करण्यात आले. परिणामी प्रकृति खलावत असतांना तीन तास होउनही कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरानी साधी पहानी केली नाही. परिणामी दोन वर्षी बालकांचा मृत्यु झाला.
डॉक्टरच्या निष्काळजी पणामुळे दोन वर्षीय बलकाला आपला जीव गमवावा लागल्याने पालकांसह परिवारातील लोकांनी कर्तव्यावर कसूर करणाऱ्या डाक्टरावर गुन्हा दाखल करून निलंबीत करावे अशी मागणी केली आहे.
चंद्रपूर जिल्हयातील सावली येथिल पार्थ आशिष प्रधाने या २ वर्षीय बालकाला त्याच्या कुटुंबीयांनी पहाटे ४.०० वाजता उपचारासाठी गडचिरोली येथिल महिला रूग्णालयात दाखल केले. परंतु यावेळी एकही डॉक्टर हजर नव्हते. डॉक्टर तारकेश्वर उईके यांची नेमणूक असतांना ते ड्युटीवर हजर नव्हते. वारंवार फोन करूनही डॉक्टर आले नाही.
डॉक्टर उईके आज सकाळी ७. ४५ वाजता आले. तोपर्यंत बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात मृतकांच्या कुटुंबीयांनी जिल्हा शल्य चिकित्सक व पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तक्रार नोंदविली त्यानूसार चौकशी सुरू केली व मृतकाचे शव पोस्टमार्टमसाठी पाठविले घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेत मा. खासदार अशोकजी नेते साहेबांनी परिवाराचे सांत्वना करीत सदर डॉक्टरावर कार्यवाही केली जाईल. अशी ग्वाही परिवारातील लोकांना दिली. सोबतच महिला रुग्णालयातील सर्व डाक्टरांची बैठक घेऊन तसेच मा. जिल्हाधिकारी संजयजी मीना यांच्या सोबत बैठक करुण सदर डॉक्टरवर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी मा. खासदरानी केली. त्यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मा. अविनाशभाऊ पाल, तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीशजी बोम्मावार, मा.श्याम हटवादे मा निखिल सुरमवार,मा. मनोज अमराजवार मा. चन्द्रकांत प्रधाने, यावेळी उपस्थित होते.

Previous articleमराठा समाज निगम मंडळाचे अध्यक्ष श्री मारुतराव मुळे यांची छत्रपती शिवाजी महाराज सहकार बँकेस सदिच्छा भेट.
Next articleअत्यावश्यक सेवा वगळता शाळा, महाविद्यालये व इतर बाबी राहाणार 16 जुलै पर्यंत बंद।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here