Home जळगाव तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा आश्रम शाळा देवळी येथे संपन्न….

तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा आश्रम शाळा देवळी येथे संपन्न….

25
0

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0041.jpg

तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा आश्रम शाळा देवळी येथे संपन्न….

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा नानासो. उत्तमराव पाटील आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा देवळी येथे संपन्न झाल्या. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदित्य सूर्यवंशी यांनी केले. यावेळी चाळीसगाव तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, एरंडोल तालुका क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण, तालुका क्रीडा समन्वय अजय देशमुख देवळे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश पाटील , तुषार खैरनार उपस्थित होते. चाळीसगाव तालुक्यातील अनेक शाळेतील चौदा, सतरा व एकोणवीस वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या संघांनी या क्रीडा स्पर्धेत भाग घेतला.
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत चौदा वर्षे वयोगटातील मुलांमध्ये प्रथम क्रमांक आश्रम शाळा देवळी, द्वितीय क्रमांक माध्यमिक विद्यालय खेडगाव , तृतीय क्रमांक जयहिंद विद्यालय चाळीसगाव तसेच मुलींमध्ये प्रथम क्रमांक शिवाजी माध्यमिक विद्यालय टाकळी प्र.दे., द्वितीय क्रमांक हॅरीसन पब्लिक स्कूल, तृतीय क्रमांक माध्यमिक विद्यालय खेडगाव या संघांनी यश संपादन केले. सतरा वर्षे वयोगटातील मुलांमध्ये प्रथम क्रमांक आश्रम शाळा मेहुनबारे, द्वितीय क्रमांक आश्रम शाळा करागाव, तृतीय क्रमांक आश्रम शाळा देवळी. तसेच मुलींमध्ये प्रथम क्रमांक शिवाजी माध्यमिक विद्यालय टाकळी प्र.दे., द्वितीय क्रमांक आश्रम शाळा राजदेहरे, तृतीय क्रमांक आश्रम शाळा देवळी या संघांनी यश संपादन केले. एकोणावीस वर्षे वयोगटात मुलांमध्ये प्रथम क्रमांक आश्रम शाळा देवळी, द्वितीय क्रमांक राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव, तृतीय क्रमांक के. आर. कोतकर जुनिअर कॉलेज चाळीसगाव. तसेच मुलींमध्ये प्रथम क्रमांक आश्रम शाळा देवळी, द्वितीय क्रमांक के. आर. कोतकर, जुनिअर कॉलेज चाळीसगाव तर तृतीय क्रमांक राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव येथील संघांनी यश संपादन केले.

Previous articleरोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी तर्फे गरीब गरजू विद्यार्थी,मुलींना सायकलींचे वाटप…
Next articleभाजपा जळगाव महानगर तर्फे जळगाव रेल्वस्थानक परिसरात ‘सेवा पखवड़ा’ अभियान अंतर्गत स्वच्छता अभियान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here