Home जळगाव रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी तर्फे गरीब गरजू विद्यार्थी,मुलींना सायकलींचे वाटप…

रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी तर्फे गरीब गरजू विद्यार्थी,मुलींना सायकलींचे वाटप…

24
0

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0030.jpg

रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी तर्फे गरीब गरजू विद्यार्थी,मुलींना सायकलींचे वाटप…

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी तर्फे गरीब गरजू विद्यार्थी,मुलींना तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथे सायकल वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी अध्यक्ष डाॅ.सौ.भाग्यश्री शिनकर तर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संगीतराव पाटील, रोटरीचे सहा.प्रांतपाल रवी भाऊ शिरूडे,सौ.मनीषा शिरुडे, चंद्रकांतभाऊ पाटील,सौ. त्रिशला निकम होते. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील सर्व समाजातील गरीब, गरजू व असह्य अशा इयत्ता सहावी ते नववी मध्ये शिक्षण घेणाऱ्या जवळपास वीस विद्यार्थिनीं मुलींना सायकलींचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष डाॅ.भाग्यश्री शिनकर यांनी केले.तर कार्यक्रमाचा उद्देश व संकल्पना सहायक प्रांतपाल रविभाऊ शिरुडे यांनी लेखाजोखा मांडला. माजी न्यायमूर्ती संगीतराव पाटील, चंद्रकांत भाऊ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी डॉ. संतोष मालपुरे,लालचंद बजाज,प्रकाश कुलकर्णी, ओमप्रकाश शर्मा,राजेंद्र छाजेड,राजेंद्र मुंदडा,संजय सोनवणे,भालचंद्र दाभाडे, श्रीकृष्ण आहिरे,निगार चव्हाण,सीमा कुलकर्णी, अनिता मोरे,आधार महाले, माधवराव पाटील,रोहित पाटील,सतीश सूर्यवंशी, संजय बहिरम,शुभम पाटील,गणेश जाधव, तसेच लाभार्थी २० विद्यार्थिनी व त्यांचे पालक समाजातील विविध क्षेत्रातील इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची रंगत शीघ्र कवी रमेश पोतदार यांनी सायकलीवरचे गीत गाऊन वाढवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा बक्षी व दीपक पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सतीश सूर्यवंशी, संजय बहीरम,शुभम पाटील,गणेश जाधव तसेच रोटरी क्लबचे सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.

Previous articleचाळीसगाव महाविद्यालयात “स्वच्छता ही सेवा” कार्यक्रम संपन्न
Next articleतालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा आश्रम शाळा देवळी येथे संपन्न….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here