Home जळगाव चाळीसगाव महाविद्यालयात “स्वच्छता ही सेवा” कार्यक्रम संपन्न

चाळीसगाव महाविद्यालयात “स्वच्छता ही सेवा” कार्यक्रम संपन्न

34
0

आशाताई बच्छाव

IMG-20231001-WA0038.jpg

चाळीसगाव महाविद्यालयात “स्वच्छता ही सेवा” कार्यक्रम संपन्न
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – येथील बी.पी. आर्ट्स, एस.एम.ए. सायन्स अँड के. के.सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज, चाळीसगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून दि. 01 ऑक्टोबर 2023 रोजी “स्वच्छता ही सेवा” या अभियानाअंतर्गत महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी सीनियर कॉलेज कमिटीचे चेअरमन सुरेशभाऊ स्वार यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आणि महाविद्यालयातील परिसर, महाविद्यालयातील वर्ग खोल्यांची स्वच्छता उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांनी मिळून केली . याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर, उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे, उपप्राचार्य डॉ. के. एस. खापर्डे, उपप्राचार्य प्रा. डी. एल. वसईकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मगर सर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बिल्दीकर यांनी स्वच्छतेचे महत्व विशद करून आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी स्वयंसेवक, कार्यक्रमाधिकारी, सह कार्यक्रमाधिकारी, प्रा. रवींद्र बोरसे, प्रा. आर. एस. पाटील, राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्व कॅडेट आणि महाविद्यालय राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख डॉ. राजेश चंदनशिव आदींनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दीपक पाटील यांनी केले.

Previous articleस्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत आपले गाव आपला परिसर……..
Next articleरोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी तर्फे गरीब गरजू विद्यार्थी,मुलींना सायकलींचे वाटप…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here