आशाताई बच्छाव
वाहतूक सुरक्षा जागृती काळाची गरज–साईनाथ वीर
दैनिक युवा मराठा
निफाड प्रतिनिधी–रामभाऊ आवारे
वाहनांची दैनंदिन वाढती संख्या व त्या तुलनेत अपूरे रस्ते तसेच सुविधांचा अभाव यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्यामुळे वाहतूक सुरक्षा जागृती करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नाशिक रस्ते परिवहन विभागाचे सहाय्यक निरीक्षक साईनाथ वीर यांनी केले.
के. के. वाघ कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविदयालय चांदोरी, येथे आयोजित वाहतूक सुरक्षा जागृती कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा जागृतीविषयी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दातीर हे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. दातीर यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या व समाजाच्या स्वास्थ्यासाठी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सायखेडा येथील जय अंबे मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक श्री. विजय खर्डे यांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सावंत, उपप्राचार्य प्रा आहेर, प्रा.राहुल पोटे,प्रा.अमोल खालकर, प्रा.पल्लवी कदम, प्रा.सुप्रिया शिरसाठ, प्रा. दिपाली शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. एन. एस. जाधव यांनी केले तर प्रा. रेशमा कडाळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास कोकाटे, कृष्णा शिंदे, कुणाल निकम, सागर बर्वे, यांनी परिश्रम घेतले.