Home पुणे किर्लोस्कर कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन चंदनाच्या झाडांची चोरी, ७ ते ८...

किर्लोस्कर कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन चंदनाच्या झाडांची चोरी, ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20230824-WA0024.jpg

किर्लोस्कर कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन चंदनाच्या झाडांची चोरी, ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल
पुणे ब्युरो चिफ उमेश पाटील
पुणे : दि. २४. खडकीतील किर्लोस्कर कंपनीच्या सुरक्षा रक्षकांला लोखंडी रॉडने मारहाण करुन ७ ते ८ जणांने ११ हजार रुपये किंमतीचे चंदनाची तीन झाडे तोडून नेले. मंगळवारी (दि.२२) राजी पहाटे साडेचारच्या सुमारास किर्लोस्कर कंपनीच्या परिसरात घडला आहे. याप्रकरणी प्रदिप कृष्णत देशमुख (वय – ४५ रा. कृष्ण कॉलनी, काळेवाडी, पुणे) यांनी खडकी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. खडकी पोलीसांनी ७ ते ८ जणांवर आय. पी. सी. कलाम ३९५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीससूत्रानुसार फिर्यादी प्रदीप देशमुख हे किलोस्कर कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करीत आहे. २२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास तिघेजण कंपनीच्या मागील संरक्षण भिंतीवरुन कंपनीच्या आवारात शिरले. तेव्हा सुपरवायझर यांनी शिट्टी वाजवली असता, चोरट्यांनी त्यांना धक्का बुक्की करुन खाली बसविले. त्यांच्या मदतीला आलेले सुरक्षारक्षक राजेंद्र पाटील यांच्या पाठीत चोरट्यानी लोखंडी रॉड मारुन खाली पाडले. फिर्यादी व आरोपी यांच्यात झटापट सुरु असताना आणखी दोन जण हातात रॉड घेऊन आले. त्यांनी राजेंद्र पाटील यांना रॉडने मारहाण केली. तसेच धमकी देऊन शांत बसण्यास सांगितले. आम्ही चंदनाची झाडे कापल्यानंतर निघून जाऊ असे म्हणाले. त्यावेळी मेनगेट मधून एक गाडी आत येवुन कटरच्या सहाय्याने आवारातील तीन चंदनाची झाडे कापण्यास सुरुवात केली. या चोरट्यांनी कंपनीच्या आवारातील ११ हजार रुपयांची तीन चंदनाची झाडे कापून नेली आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील करीत आहेत

Previous articleबाभुळगाव कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी केले ग्रामीण मूल्यांकन
Next articleनिवडणूक विभागाकडून नवीन मतदार नोंदणी आणि मतदार जागृती कार्यक्रम!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here