आशाताई बच्छाव
लोह्यात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
अंबादास पाटिल पवार
लोहा/प्रतिनिधि
लोहा शहरासह तालुक्यात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. अनेक संस्थांनी वृक्षारोपण, फळे वाटप, खाऊ वाटप, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान राबवून स्वातंत्र्य दिन साजरा केला.
लोहा तालुक्यासह शहरात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच विविध सामाजिक संस्थेच्या वतीने अनेक उपक्रमाव्दारे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांची सांगता करण्यात आली. लोहा जि. प. हायस्कूल येथे प्रारंभीच्या ध्वजाचे ध्वजारोहण प्राथमिक सहशिक्षक राजीव तिडके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक हेमंत कंवर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळा प्रांगणात हुतात्मा स्मारकाचे लोकार्पण मुख्याधिकारी वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. नगर परिषद कार्यालयातील प्रांगणात प्रारंभी मुख्याधिकारी वाघमारे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तर तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा सह नगरसेवक, कार्यालयीन कर्मचारी, शहरातील मान्यवर मंडळी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. लोहा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सुभाष उन्हाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पो.उप. नि. चने, उपनिरीक्षक मारोती सोनकांबळे, मंगेश नाईक, महिला पो.उप.नि.रेखा काळे सह बहुसंख्य पोलिस कर्मचारी उपस्थित होते. जि. प. प्रा. शाळा अंतेश्वर येथे शाळेचे मुख्याध्यापक बोडलवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी आघाडीचे प्रदेश सचिव गजानन पाटील क-हाळे यांच्या वतीने विद्यार्थ्याना शालेय शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच गावातील पहिले सैनिक मारुती पाटील क-हाळे यांच्या मातोश्री निर्मला क-हाळे यांचा शाळा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गावचे सरपंच तुकाराम पाटील क-हाळे, माजी सरपंच सतीश पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकरराव पाटील क-हाळे, उपाध्यक्ष गोविंदराव पाटील, सेससोचे चेअरम अच्युतराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजाराम पांचाळ सह शिक्षक कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, से. स. सोसायटीचे सदस्य, नागरिक बहुसंख्येने उपस्थितीत होते. तर मुख्य तहसील कार्यालया चा ध्वजारोहण तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्य सैनिक यांच्या वारसांचा यथोचित मानसन्मान करण्यात आला. याप्रसंगी नायब तहसीलदार अशोक मोकले, संजय भोसीकर, गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, विविध पक्षांचे पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. शिवाजी महाराज चौकात कर्नल ग्रुप च्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. पोलिस ठाण्यासमोर सतीश अनेराव यांच्या वतीने रतदान शिबिर घेण्यात आले. वृक्षमीत्र फाऊंडेशन यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.