Home नाशिक जि.प.शाळा वनसगाव ता.निफाड येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

जि.प.शाळा वनसगाव ता.निफाड येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

80
0

आशाताई बच्छाव

IMG-20230817-WA0060.jpg

जि.प.शाळा वनसगाव ता.निफाड येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

आय .एस .ओ.मानांकन प्राप्त,आदर्श जि.प.सेमी इंग्रजी प्राथमिक विद्यामंदिर वनसगाव ता.निफाड जि.नाशिक येथे भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजपुजन शा.व्य.समिती सदस्य सुभाष जाधव,पत्रकार रामभाऊ आवारे सर यांनी केले.तर ध्वजारोहन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूसाहेब यशवंत शिंदे यांनी केले.विद्यार्थ्यांनी ,ध्वजगीत,व राज्यगीत गायन केले. विद्यार्थ्यांच्या वेशभूषेत आकर्षक ठरल्या.कै.निवॄती सखाराम शिंदे स्मरणार्थ, सुनिल निवृती शिंदे व बंधू यांनी शाळेसाठी पितळी बेल ( घंटा) दिली.त्याबद्दल सत्कार करण्यात आला.डाॅ. योगेश डुंबरे यांनी शाळेला प्रिंटर भेट दिला त्याबद्दल सत्कार करण्यात आला.यशवंत यमाजी शिंदे यांनी 5000 शाळेला दिले त्यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्याची वक्तृत्व व देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या.प्रसंगी उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूसाहेब यशवंत शिंदे.उपाध्यक्ष संतोष अस्वले,सदस्य सुभाष जाधव,पत्रकार रामभाऊ आवारे सर ,सुरेश चारोसकर,शरद शिंगाडे, नामदेव शिंदे,संदिप डुंबरे,योगेश शिंदे,राहुल डुंबरे,माता पालक संघ उपाध्यक्ष अंजली भरत आवारे,व सदस्य ,शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष संदिप कापडी,रवींद्र कापडी,राजरत्न निरभवणे वनसगाव विद्यालयाचे प्राचार्य सी डी रोटे सर , पर्यवेक्षक के बी दरेकर सर व शिक्षक वृंद,सरपंच महेश केदारे व सदस्य व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते सूत्रसंचालन दिपक माहेवार सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी राजेंद्र कापडणीस सर, समाधान पवार सर, मुख्याध्यापक आनंदा राजगुरु सर ,सुनिता शेले,मंगल शिंदे ,सविता घाडगे,सुवर्णा शिंदे,कांताबाई रायते,वंदना जावळे यांनी परिश्रम घेतले मुख्याध्यापक आनंदा राजगुरु यांनी आभार मानले.

Previous articleमालेगाव येथे पुलक मंच परिवार तर्फे निशुल्क चिकित्सा शिबीर संपन्न
Next articleलोह्यात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here