• Home
  • माध्यम क्षेत्रातील ४० टक्के नोकऱ्यांवर गदा*

माध्यम क्षेत्रातील ४० टक्के नोकऱ्यांवर गदा*

*🛑माध्यम क्षेत्रातील ४० टक्के नोकऱ्यांवर गदा*🛑
*पत्रकार संकटात ✍️ – सकाळ टाईम्स, गोमंतक टाईम्स पेपर बंद पडला*
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे, दि. २८– कोरोनाचा फटका जगभरातील विविध क्षेत्रांना बसतो आहे. बहुसंख्य कंपन्यांतून कामगार कपात, वेतन कपात सुरू आहे. त्यात विमान कंपन्या, ट्रॅव्हल कंपन्या, पंचतारांकीत हॅटेलस्, आयटी उद्योग, वाहन उद्योगांसह छोट्यामोठ्या उद्योगांचा समावेश आहे. या रांगेत आता लोकशाहीचा एक स्तंभ असलेल्या माध्यमांचाही समावेश झाला आहे. सुमारे ४० टक्के पत्रकार आणि पत्रकारितेर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. पत्रकारितेवर नैराश्याचे ढग दाटले आहेत, पण सरकारी पातळीवर त्याबाबत चकार शब्द एकही नेता बोलत नसल्याने राज्यातील पत्रकार नाराज आहेत.

कोरोना विषाणुचा विळखा वाढतच चालला आहे. सर्वाधिक फटका मराठी मीडियाला बसला असे आता पुढे आले आहे. अनेक मोठ्या दैनिकांनी त्यांच्या आवृत्या बंद केल्या आहेत अथवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. खर्चात कपात करण्यासाठी मनुष्यबळ कपात करण्याची मोहिम सुरू आहे. काही दैनिकांनी वेतनाच्या ५० टक्के पर्यंत कपात केली, तर मोठ्या इंग्रजी दैनिकाने सरळ जेष्ठ संपादकीय मंडळातील मोठ्या पगाराचे संपादकांनाच घरचा रस्ता दाखवला आहे. मराठी दैनिकांनी काही मोठी कार्यालये, तालुका, जिल्हा पातळीवरची विभागीय कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या निमित्ताने सुरवातीला मार्च महिन्यातच वेतन कपातीची कुऱ्हाड शेकडो पत्रकारांवर चालविण्यात आली. बंदच्या काळात छपाई बंद राहिल्याने जाहिरातीचे उत्पन्न झिरोवर आल्याने आता उर्वरीत कर्मचाऱ्यांच्या पगाराची चिंता सर्व वृत्तपत्र मालकांना लागून राहिली आहे. आता मे महिन्यांचे पगार होतील की नाही, इतपत शंका व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या काळात छापलेली वृत्तपत्र वितरण करण्यात मोठा अडळथा आला. अंक प्रिंट केला तरी अजितबात जाहिराती नसल्याने पुढचे गणित कोलमडले. खर्च कपात कऱण्यासाठी बहुतांश दैनिकांनी पेपरची पाने कमी केली आहेत. कोरोनामध्ये जवळपास सर्व मीडिया भरडला गेल्याचे सांगण्यात आले.

कर्मचारी कपातीची सुरवात पुण्यनगरीतून सुरू झाली. मुख्य संपादक, सांगली आवृत्तीचे संपादक यांना घरी पाठविले. पाठोपाठ महाराष्ट्र टाईम्स ने कोल्हापूर आवृत्तीच बंद केल्याने मोठा भूकंप झाला. तिथे ३० पत्रकारांसह एकूण ६० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली. आता आणखी तीन आवृत्या बंद करण्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा माध्यम वर्तुळात आहे. पुढारीने मराठवाडा आवृत्ती तोट्यात असल्याचे सांगत बंद करण्याचा निर्णय घेतला असून फक्त जिल्हा प्रतिनिधींना घरातून काम पाहायला सांगितले आहे. पुणे सकाळ मधील कर्मचाऱ्यांची वेतन कपात करण्यात आली. सर्वात धक्कादाक म्हणजे महाराष्ट्रातील अग्रगण्य सकाळ माध्यम समुहाच्या इंग्रजीतील सकाळ टाईम्स (पुणे) व गोमंतक टाईम्स (गोवा) या आवृत्या अचानक बंद करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला. बातमीदारी करणाऱ्या पत्रकारांना अचानक सांगितल्याने मोठा धक्का बसला. सुमारे ५० कर्मचारी बेरोजगार झाल्याचे सांगण्यात येते. पुणे शहरात हिंदुस्तान टाईम्स हे आणखी एका मोठ्या ग्रुपचे मोठे दैनिक आहे. या ग्रुमध्ये देशपातळीवर १३० वरिष्ठांना स्वतःहून राजीनामा देण्याचा निरोप आला अशी माध्यमकर्मींमध्ये चर्चा आहे. या दैनिकाची मराठी आवृत्ती बंद करण्यात आली. अशा पध्दतीने लोकमत, दिव्य मराठीसह अन्य छोटया दैनिकांवरही नोकर कपातीची वेळ आल्याने जनतेची बाजू मांडणऱ्या पत्रकारांमध्येच आता प्रचंड खळबळ आहे.

anews Banner

Leave A Comment