Home नाशिक मालेगाव येथे पुलक मंच परिवार तर्फे निशुल्क चिकित्सा शिबीर संपन्न

मालेगाव येथे पुलक मंच परिवार तर्फे निशुल्क चिकित्सा शिबीर संपन्न

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20230817-WA0059.jpg

 

मालेगाव येथे पुलक मंच परिवार तर्फे निशुल्क चिकित्सा शिबीर संपन्न

गणेश पाटील – मालेगाव येथे पुलक मंच परिवार तर्फे निशुल्क चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते परम पूज्य गुरुदेव आचार्य श्री पुलक सागर जी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने पुलक मंच परिवार मालेगाव येथे 15 ऑगस्ट याचे औचित्य साधून एक दिवसीय निशुल्क चिकित्सा शिबीराचे आयोजन श्री दुर्गा माता मंदिर पटांगण कलेक्टर पट्टा मालेगाव या ठिकाणी संपन्न झाला या शिबिराचा शुभारंभ उपस्थित असलेले नागरिक तसेच पुलक मंच परिवार मालेगाव तसेच लहान बालकांनी राष्ट्रगीत गाऊन तसेच भगवान श्री महावीर जी आणि परम पूज्य गुरुदेव आचार्य श्री पुलक सागर जी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत आशिर्वाद घेतले या शिबिरासाठी उपस्थित असलेले विनिता जी बडजाते, सुनंदा जैन, जेनिशा जैन, तथा डॉ. प्रकाश जैन, चेतन बडजाते, डॉ. विनोद जाधव, यांनी या कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला या शिबिरामध्ये 253 बालक निशुल्क स्वास्थ परीक्षण करून त्यांना मोफत औषध वाटप करण्यात आले. तसेच डॉ. विनोद जाधव, डॉ. प्रकाश जैन, डॉ. सुखदेव ठाकूर, डॉ. सोमनाथ खुराड, डॉ. विनोद जैन,चेतन बडजाते, तसेच जैन आयुर्वेदिक स्टोर्सचे आशुतोष जैन, सिद्धार्थ मित्र मंडळ, मालेगाव व रुपेश पटाईत, आशुतोष जैन, सोनू लोणकर, विनिता बडजाते, अनिता बडजाते, जेनिशा जैन, राधिका जैन, संगीता पहाडे, मधुमती बडजाते, अमित कासलीवाल,आशिष कासलीवाल,चेतन पहाडे, नीरज बडजाते, या सर्वांनी निशुल्क शिबिरासाठी मेहनत घेतली. व शेवटी पुलक मंच परिवाराचे डॉ. प्रकाश जैन यांनी सर्वांचे आभार मानले.तसेच मीडिया कव्हरेज साठी बलराम चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Previous articleपांगरा येथे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल
Next articleजि.प.शाळा वनसगाव ता.निफाड येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here