Home नांदेड पांगरा येथे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल

पांगरा येथे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल

84
0

आशाताई बच्छाव

IMG-20230817-WA0061.jpg

पांगरा येथे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल
अंबादास पाटिल पवार
लोहा/प्रतिनिधि
भारत देशाची आज जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आली तरी आजही देशात जातीयवाद मोठ्या प्रमाणात फोफावल्या चित्र दैनंदिन घडणाऱ्या घटनेवरून समोर येत आहे. एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाची सांगता करत असताना दुसरीकडे एका समूहाकडून दुसऱ्या समूहाला तुच्छ लेखण्याचा प्रकार घडला. पांगरा (तळ्याचे) येथे दुकानास जाणाऱ्या सोळा वर्षीय मुलास गावातील एकाने जातीवाचक टिप्पणी करत मन दुखावले त्याचा जाब विचारणाऱ्या सदरील मुलास जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी लोहा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लोहा पोलिस ठाणे हद्दी अंतर्गत असलेल्या पांगरा (तळ्याचे) ता. कंधार जि. नांदेड येथील इयत्ता दहावी वर्गात शिक्षण घेणारा विजय ईश्वर वाघमारे (वय १६) हा घरातील लागणारे अत्यावश्यक किराणा साहित्य आणण्यासाठी गावातीलच एका दुकानाकडे दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजताचे दरम्यान जात असताना गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकी नजीक समाज मंदिरासमोर असलेल्या रोहन गंपू घोर बांड याने पोतलिंग असे जातीवाचक शब्द प्रयोग करून चिडविले असता विजय याने रोहन गंपु घोरबांड यासअसे का चिडवतोस असे म्हणाले असता “मादरचोदा मांगाच्या तुला चिडवल्याने काय झाले” असे म्हणुन जातीवाचक शिवीगाळ करून थापडा बुक्यांनी पाठीवर मुक्कामार दिला तसेच त्याच्या हातातील कड्याने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तु पुन्हा माझ्या नादाला लागलास तर तुला खतम करतो असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी शुभम बजरंग ठाकुर, सोनु बालाजी पाडदे दोघे रा. पांगरा यांनी भांडणाच्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहून सोडवा सोडव केली.
याप्रकरणी विजय वाघमारे याने दिलेल्या तक्रारीवरून लोहा पोलिसात सदर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात करत आहेत.

Previous articleमालेगाव मध्य विधानसभा वॉर रूमचा उद्घाटन समारंभ संपन्न
Next articleमालेगाव येथे पुलक मंच परिवार तर्फे निशुल्क चिकित्सा शिबीर संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here