आशाताई बच्छाव
सुर्यकांत लच्छीराम दासरवार केंद्रप्रमुख संकुल अंबुलगा तालुका मुखेड यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा संपन्न
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे
मुखेड तालुक्यातील अंबुलगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने सहशिक्षक केंद्र प्रमुख श्री सुर्यकांत लच्छीराम दासरवार यांचा सेवापूर्ती सोहळा दि.२८ एप्रिल २०२५ रोजी अंबुलगा शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष क्र.उ.बा.समीती सभापती बालाजी पाटील अंबुलगेकर सरपंच सौ. अर्चना ताई रॅपनवाड ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून होनधरणे गट शिक्षणाधिकारी मुखेड शि.वि.अ. ध्याडे ,नायब तहसीलदार नांदेड संजय नागमवाड शि. वि.अ.बाळासाहेब कदम,येवतीकर,कराळे सर, केंद्रप्रमुख करेवाड, शिवाजी पाटील,गिरी सर, पोलीस पाटील कौरवाड शालेय शिक्षण समीती अध्यक्ष माधव देशटवाड सर्व केंद्रातील मुख्याध्यापक, आरोग्य कर्मचारी, अशा वर्कर, सर्व ग्रा.प.सदस्य यांचीही उपस्थिती होती. या बरोबरच गावातील सर्व नागरिक, अंगणवाडी सेविका व समाज सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शिंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन पद्माकर दापके यांनी केले.मुक्रमाबाद येथील किशनराव दासरवार परीवार कडुनही मोठा सत्कार करण्यात आला.






