Home जळगाव प्रवाशांना मोठा दिलासा! भुसावळून धावणाऱ्या मेमू गाड्यांना आता 8 ऐवजी 12 डबे

प्रवाशांना मोठा दिलासा! भुसावळून धावणाऱ्या मेमू गाड्यांना आता 8 ऐवजी 12 डबे

53
0

आशाताई बच्छाव

IMG-20230630-WA0051.jpg

प्रवाशांना मोठा दिलासा! भुसावळून धावणाऱ्या मेमू गाड्यांना आता 8 ऐवजी 12 डबे

जळगांव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील.

मेमू गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत असल्याने अनेकदा बसण्यासाठी दूरच उभे राहण्यासाठी जागा नसते. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांकडून मेमू गाड्यांच्या डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली जात होती. अखेर रेल्वे प्रशासनाने आता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मेमू गाड्यांना आठ ऐवजी १२ डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून म्हणेजच १ जुलै पासून मेमू १२ डबे घेऊन धावेल. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या गाड्यांना अतिरिक्त डब्बे
चाळीसगाव-धुळे मेमूला पूर्वी सात डबे होते. मात्र
ती आता आठ डबे घेवून १ जुलैपासून धावणार
आहे. भुसावळ देवळाली ही संध्याकाळी सुटणारी
आठ डब्यांची मेमू गाडी आता १० जुलैपासून १२
डबे घेऊन धावेत तर देवळाली-भुसावळ या मेमूला ११ जुलैपासून १२ डबे जोडण्यात येतील.

भुसावळ-वर्धा मेमूला देखील आठऐवजी आता १२ डबे जोडण्यात येतील. ती ११ जुलैपासून धावणार आहे. वर्धा-भुसावळ मेनू ही गाडी १२ जुलैपासून १२ डब्यांसह धावेल. तसेच वर्धा बल्लारशाह ही मेमू गाडी १२ जुलै पासून १२ डबे घेऊन चालेल. बल्लारशाह वर्धा मेमू ही गाडी १२ जुलैपासून १२ डबे घेवून धावणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

Previous articleजगणं कोणासाठी…..?
Next articleपब्लिक स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा पायीं दिंडी सोहळा !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here