Home नांदेड पब्लिक स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा पायीं दिंडी सोहळा !

पब्लिक स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा पायीं दिंडी सोहळा !

100
0

आशाताई बच्छाव

IMG-20230630-WA0050.jpg

पब्लिक स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा पायीं दिंडी सोहळा !

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

मुखेड तालुक्यातील
येवती येथे श्री सद्गुरू नराशाम महाराज पब्लिक स्कूलच्या वतीने चिमुकल्या बाल कलाकारांनी पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त वारकरी वेशभूषा परिधारण करुन गावातील मुख्य रस्त्याने टाळ मृदंगाच्या गजरात काढली पायीं वारी दिंडी.

येवती येथील श्री सद्गुरू नराशाम महाराज पब्लिक स्कूलच्या वतीने पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांचा पायीं दिंडी सोहळा वाजत गाजत शाळेतुन गावातील मुख्य रस्त्याने श्री तिर्थक्षेत्र लघु आळंदी श्री सद्गुरू नराशाम महाराज मठ संस्थान येवती येथे गेला होता.

बाल विद्यार्थ्यांनी काढलेला आषाढी पायीं वारी दिंडी सोहळा पाहण्यासाठी येथील मठाचे मठाधिपती श्री सद्गुरू नराशाम महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
चिमुकल्या विद्यार्थ्यांने काढलेली पायीं दिंडी सोहळा पाहुण महाराजाने विद्यार्थ्यांचे मोठे कौतुक केले.

काही वेळ महाराजांच्या समोर विद्यार्थ्यांनी पायीं दिंडी सोहळ्यातील अनेक देखावा साजरा केल्यानंतर ही दिंडी परत आपल्या शाळेकडे मार्गस्थ झाली.

या दिंडी सोहळ्याचे आयोजन श्री सद्गुरू नराशाम महाराज पब्लिक स्कूलच्या वतीने संचालक आनंदराव राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
यावेळी या पायीं दिंडी सोहळ्यात गावातील भजनी मंडळी महिला वर्ग गावातील नागरिक पालक व शाळेतील शिक्षक, शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते .

Previous articleप्रवाशांना मोठा दिलासा! भुसावळून धावणाऱ्या मेमू गाड्यांना आता 8 ऐवजी 12 डबे
Next articleओबीसी चे ६९ हजार ३२० लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here