Home अमरावती ओबीसी चे ६९ हजार ३२० लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत.

ओबीसी चे ६९ हजार ३२० लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत.

79
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230630-191025_WhatsApp.jpg

ओबीसी चे ६९ हजार ३२० लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा
पी एन देशमुख
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती.
अमरावती जिल्ह्यात गरजू ओबीसी लाभार्थ्यांची घरकुलासाठी मोठी प्रतीक्षा यादी असताना मात्र दरवर्षी अल्प म्हणजेच केवळ ४ते५ हजार लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे ही यादी केव्हा संपुष्टात टाक येईल, असा प्रश्न ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्याकडून उपस्थित होत आहे. याकरिता स्वातंत्र्य उद्दिष्ट देण्यात यावे. अशी जिल्ह्यातील आधीच घरकुल सर्वे मध्ये मोठ्या प्रमाणात घोळ केल्याने कित्येक गरजू लाभार्थींना यादीतून वगळण्यात आले आहे. ज्यांना घरकुल ची गरज नाही अशांची नावे या यादीत समाविष्ट आहेत. एकाला काहीच नाही तर एकाच घरी दोन ते तीन घरकुल मंजूर झाल्याची समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओरड होत असताना जिल्हा परिषद सुटलेल्या घरकुल लाभार्थ्यांची यादी ग्रामसभा घेऊन नव्याने तयार केली आहे यामध्ये १लाख३३ हजारावर लाभार्थ्यांचा समावेश आहे. या लाभार्थ्यांची ड प्रपत्राची प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. रमाई, शाबरी व आदि वंचित घटकाकरिता स्वातंत्र्य उद्दिष्ट दरवर्षी शासनाकडून प्राप्त होते परंतु ओबीसी ची यादी सर्वसाधारण मध्ये येत असल्याने आणि याचा आकडा हा ६९ हजार ३२० वर असताना दरवर्षी केवळ ४ते५ हजारावरच ओबीसी प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. मागील वर्षी जिल्हा करता केवळ१४ हजार घरकुलीचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. यामध्ये ओबीसी चे ५ हजार ५६० घरकुल मंजूर करण्यात आले आहे त्यामुळे ही यादी पूर्ण होण्याकरता आणखीन लाभार्थ्यांना किती वर्षे घरकुलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शासनाने यादी दाखल घेऊन ओबीसी करता स्वातंत्र्य उद्दिष्ट देण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे

Previous articleपब्लिक स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा पायीं दिंडी सोहळा !
Next articleईपीएस १९९५ पेन्शन धारक चळवळीचा गतिमान शिलेदार मुरारी कांबळे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here