Home नांदेड ईपीएस १९९५ पेन्शन धारक चळवळीचा गतिमान शिलेदार मुरारी कांबळे

ईपीएस १९९५ पेन्शन धारक चळवळीचा गतिमान शिलेदार मुरारी कांबळे

153

आशाताई बच्छाव

IMG-20230630-WA0045.jpg

ईपीएस १९९५ पेन्शन धारक चळवळीचा गतिमान शिलेदार मुरारी कांबळे

अंबादास पाटिल पवार
लोहा/प्रतिनिधि

मागील अनेक कालावधी पासून ईपीएस १९९५ पेन्शन धारकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारे पेन्शन धारकांच्या लढ्याचे अग्रणी लोकप्रिय नेते सेवानिवृत्त वरिष्ठ तंत्रज्ञ (लाईनमन) मुरारी कांबळे यांचा आज १ जुलै रोजी ७७ वा वाढदिवस त्यांच्या असंख्य चाहत्या मंडळींकडून साजरा करण्यात येत आहे. तर बळीराजा मार्केट शिवाजी चौक लोहा येथे अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
पेन्शनर चळवळीचे मुख्य शिलेदार मुरारी कांबळे यांचा जन्म दि. १ जुलै १९४७ रोजी नांदेड येथे झाला. मुरारी कांबळे हे ईपीएस १९९५ निवृत्त कर्मचारी संघटनेचे चळवळीचे मुख्य शिलेदार तथा लोहा तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. तसेच ते बळीराजा हौसिंग सोसायटी चे संचालक आहेत. मुरारी कांबळे यांनी १९९३ मध्ये झालेल्या व्यसनमुक्ती अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला. १९६८ मध्ये कांबळे हे तत्कालीन विद्युत मंडळ मध्ये कर्तव्या वर रुजू झाले. त्या काळात त्यांना वेतन केवळ ८७ रुपये मिळत होते. त्यावेळी सिंगल फेस मीटरला ३५ रुपये कोटेशन होते. दि. ३० जून २००५ रोजी मुरारी कांबळे हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांना निवृत्त होऊन जवळपास १८ वर्ष पूर्ण झाले. यापूर्वी सन १९६८ ते १९७० या कालावधी दरम्यान मुरारी कांबळे यांनी नांदेड ते लोहा या नवीन वीज लाईनचे काम जंगमवाडी १३२ के व्हि नांदेड येथून ३३ केव्ही नवीन लाईनचे काम करून लोहा उपकेंद्रात लाईन जोडून सिक्स पोल डीपी उभारली. १९६९ मध्ये ३३ केव्ही लाईन चालू केले. ईपीएस १९९५ या राष्ट्रीय संघर्ष समिती नवी दिल्लीचे अध्यक्ष कमांडो अशोक राऊत आणि भाजप च्या मथुरेचा खा. हेमा मालिनी तसेच पंतप्रधान यांची भेट घेतली. सेवानिवृत्त कर्मचारी बांधवांच्या पेन्शन वाढीचा प्रश्न चर्चा करून नवी दिल्ली येथे २५ एप्रिल ते १७ मे २०१९ पासून वाढीची प्रक्रिया सुरुवात झाली. हे त्यांच्या लढ्याचे फलित होय. त्यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा..!

Previous articleओबीसी चे ६९ हजार ३२० लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत.
Next articleपत्रकारितेतील निर्भिड व्यक्तीमत्व शिवराज पाटील पवार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.