Home जालना शिवशक्ती आश्रमात हर हर महादेवाचा गजर आाणि विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल

शिवशक्ती आश्रमात हर हर महादेवाचा गजर आाणि विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240307_055430.jpg

शिवशक्ती आश्रमात हर हर महादेवाचा गजर आाणि विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: तुपेवाडी (ता.बदनापूर) येथील शिवशक्ती आश्रमात महाशिवरात्र महोत्सव सोळयानिमीत्त अखंड हरीनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा आणि शिवलीला अमृत ग्रंथ पारायण सोहळयाचे दि.2 पासून आयोजन करण्यात आले आहे. प.पु.ब्रम्हलीन नागाबाबा यांच्या आशिर्वादाने व प.पु.बालयोगी खडेश्वरी यांच्या प्रेरणेने हा सोहळा आयोजित करण्यात आला असून हे या सोहळ्याचे पंचवीसावे वर्षे आहे.  सेाहळयात दररोज किर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून हर हर महादेवाचा गजर होत असल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
या सोहळयात विविध धार्मीक कार्यक्रम होत असून समाज प्रबोधन व सामाजिक उपक्रम राबवत प्रभू श्रीराम मंदिराचा जिर्णोध्दारतून त्रिवेणी संगम साधला जात आहे. सोहळयाला महराष्ट्रातील नामवंत संत महंत उपस्थित राहून किर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत आहे. सोहळयात ह.भ.प. जनार्दन महाराज राजपुत, अनिरूध्द महाराज राजपुत, शिवचरित्रकार  गजानन महाराज देठे, महामंडलेश्वर कृष्ण चैतन्यपुरी महाराज, ज्ञानेश्वर महाराज शेलूदकर, पुरूषोत्तम महाराज पाटील, वैजीनाथ महाराज थोरात, अमोलानंद महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळयात भाविकांना सकाळ, दुपार, संध्याकाळ अन्नदात्याकडून भोजनाची सोय करण्यात आली आहे. सोहळयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळयात धार्मीक कार्यक्रम, समाजप्रबोधन, सामाजिक उपक्रम राबवून त्रिवेणी संगम साधण्यात येत आहे. अलिकडे प.पु.खडेश्वरी बाबा यांच्या प्रेरणेने होत असलेल्या सोहळयात दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. 9 मार्च रोजी काल्याचे किर्तन होवून समाप्ती होणार आहे.

Previous articleमहाशिवरात्रीनिमित्त बरडी येथे उद्या श्री. भोेलेश्वर दर्शन  सोहळा
Next articleमुळा महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here