Home बुलढाणा अर्थ साहाय्य योजनेच्या 66 लाभार्थ्यांच्या खात्यात 13 लाख 20 हजार रुपये जमा...

अर्थ साहाय्य योजनेच्या 66 लाभार्थ्यांच्या खात्यात 13 लाख 20 हजार रुपये जमा – तहसीलदार योगेश्वर टोंपे

134
0

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0021.jpg

अर्थ साहाय्य योजनेच्या 66 लाभार्थ्यांच्या खात्यात 13 लाख 20 हजार रुपये जमा – तहसीलदार योगेश्वर टोंपे

विशेष प्रतिनिधी
ज्ञानेश्वर पाटील दांदळे

संग्रामपूर तालुकयातील राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील 66 लाभार्थांचे प्रकरणे मागील दोन वर्षापासुन निधी अभावी रखडलेले असून महसुल विभागाच्या पाठपुराव्याने अखेर निधी प्राप्त़ झाल्याने 13 लाख 20 हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती संग्रामपूर तहसिलदार योगेश्व़र टोंपे यांनी दिली आहे. शासनामार्फत विविध स्तरावरील नागरीकांसाठी वेगवेगळया योजना राबवल्या जातात. दारिद्र रेषेखाली मोडणाऱ्या नागरीकांसाठी महत्वाची अशी एक योजना म्हणजे राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य़ योजना आहे. दारिद्ररेषेखालील कुटुंबातील प्रमुख किंवा कमावत्या़ व्यक्तींचा अकस्मात मृत्यू झाल्यास संबंधीत कुटुंबाला अर्थसहाय्य़ म्हणुन राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य़ योजनेअंतर्गत 20 हजार रुपये देण्यात येतात. मागील दोन वर्षांपूर्वी 66 लाभार्थ्यांचे प्रकरणे तत्कालीन प्रभारी तहसिलदार विजय चव्हाण यांनी मंजुर केले होते. परंतु शासनाने धनादेश ऐवजी थेट पे पेमेंटद्वारे लाभार्थ्यांना खात्यात मिळावे यासाठी ऑनलाईन पध्दत राबविण्यात आली होती. मागील दोन वर्षांपासून ग्रॅण्ड नसल्यामुळे 66 कुटंब अनुदानापासून वंचित राहिले होते, परंतु नवीन रुजू झालेले संग्रामपूर कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश्वर टोम्पे , नायब तहसिलदार विजय चव्हाण, संजय गांधी विभागच्या ना. तहसीलदार एम.डी. नैताम यांनी वेळोवेळी शासनाकडे पत्र व्यवहार करून पाठपुराव्याने अखेर 66 लाभार्थ्यांना 13 लाख 20 हजाराचा ग्रँड येताच पे पेमेंट द्वारे थेट खात्यात प्रत्येकी 20,हजार रुपये प्रमाणे रक्कम जमा झाल्याची माहिती तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी दिली आहे.वंचित राहलेल्या 66 लाभार्याना लाभ मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला आधार मिळाला आहे.
♦️ तत्कालीन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्या कामचुकारपणामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील तालुक्यात 66 लाभार्थी लाभापासून वंचित होते. वरणगावकर यांनी योग्य तो पाठपुरावा न करता इतरत्र वेळ खर्ची घालत होते, त्यामुळे दोन वर्षापासून रखडलेला निधी अखेर नव्याने आलेले तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी 20 हजार जमा.♦️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here