• Home
  • राहुरी फॅक्टरी येथील अवैध धंदे बंद करावेत,ही काळाची गरज आहे

राहुरी फॅक्टरी येथील अवैध धंदे बंद करावेत,ही काळाची गरज आहे

राहुरी फॅक्टरी येथील अवैध धंदे बंद करावेत,ही काळाची गरज आहे राहुरी प्रतिनिधी(प्रा,ज्ञानेश्वर बनसोडे युवा मराठा न्युज नेटवर्क)- सध्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी फॅक्टरी व परिसरात अवैद्य धंद्यांना मोठया प्रमाणात उत आला आहे, दिवस भर मोलमजुरी करायची आणि आणि संध्याकाळी मात्र अवैद्य धंद्यांना मोठया प्रमाणात साथ द्यायची, त्यात मटका -दारू, व पत्ते व आदीं सारखे धंदे मोठया प्रमाणात जोर धरू लागले आहेत, दारू सारख्या या धंद्याने मात्र अनेकांचे ससार उध्वस्त झाले ,अनेक जण जिवाला मुकले आहेत ,याची जाणीव या व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या लोकांना असतेच ,तरी देखील या जीव घेण्या व्यसनापासून दूर होऊ शकत नाही याचे प्रमुख्य कारण म्हणजे ” कळते पण वळत नाही’ अशी अवस्था या व्यसनी माणसाची झाली आहे, , या जीवघेण्या व्यसनापुढे मात्र सर्व समान असतात ,हे घातक व्यसन मात्र गरीब श्रीमंत असा भेद करीत नाही, थोडक्यात ” संसार केला कोटया न कोटी ,मेल्यावर मात्र
संग येईना लंगोटी” अशी अवस्था या जीवघेण्या व्यसनाने केली आहे,,म्ह णून या या अवैद्य धंदयाना वेळीच आवर घालण्यासठी पोलीस प्रशासन ,व स्थानिक सामाजिक संघटनांनी वेळीच लक्ष घालून हे जीव घेणे अवैद्य धंदे त्वरित बंद करावेत ,कारण थोडक्यात:म्हातारी मेल्याचे दुःख नाही ,पण काळ सोकाऊं नये अशी चर्चा सध्या जोर धरत आहे, म्हनुन पोलीस प्रशासनाने या बाबत त्वरीत लक्ष घालून हे राजरोसपणे चालणारे अवैद्य धंदे बंद करावेत,अशी मागणी नागरीकानमधून करणयात येत आहे

anews Banner

Leave A Comment