Home Breaking News *आता व्हॉट्सअँपच्या माध्यमातूनही करता येणार पैसे* *ट्रान्सफर*

*आता व्हॉट्सअँपच्या माध्यमातूनही करता येणार पैसे* *ट्रान्सफर*

96
0

*आता व्हॉट्सअँपच्या माध्यमातूनही करता येणार पैसे* *ट्रान्सफर*

*युवा मराठा न्यूज*

दिल्ली : व्हॉट्सअँपच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्याला फोटो, व्हिडिओ पाठवणे शक्य होते परंतु, व्हॉट्सअँपनं लाँच केलेल्या यूपीआय पेमेंट सुविधेमुळे पैसे ट्रान्सफर करणेही शक्य झाले. व्हॉट्सअ‍ॅपला भारतात यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) दिलेल्या अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅपला भारतात यूपीआय आधारित सिस्टम सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
जून महिन्यामध्ये व्हॉट्सअँपने पेमेंट सर्व्हिस सुरू केली होती. परंतु ही सेवा वापरण्याची संधी केवळ काही व्हॉट्सअँप यूजर्सला मिळाली होती.
आतादेखील NPCI ने काही मोजक्या क्रमांकाना व्हॉट्सअॅप मनी ट्रान्सफरची सेवा वापरण्याची परवानगी दिली आहे. परंतु आता कंपनी आगामी काळात ही मर्यादा वाढवणार आहे.
NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअँप पेमेंट सुविधेसाठी गो लाईव्हची मंजुरी देण्यात आली आहे. व्हॉट्सअँप या मंजुरीच्या प्रतिक्षेत होता, कारण या सुविधेची चाचणी अगोदरच घेण्यात आली होती. त्यामुळे आता लवकरच व्हॉट्सअँप पेमेंटचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
व्हॉट्सअ‍ॅप यूपीआय वर जास्तीत जास्त 20 दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्त्याचा आधार घेऊन आपला यूपीआय यूजर बेस वाढवू शकतो, अशी माहिती NPCI ने दिली आहे. परंतु यासंदर्भात अद्याप व्हॉट्सअँपकडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
व्हॉट्सअँपने फेब्रुवारी 2018मध्ये भारतात आपल्या UPI बेस्ड पेमेंट सर्विसची बीटा टेस्ट सुरु केली होती. भारत हा पहिला देश आहे. जिथे फेसबुकची मालकी असणारी कंपनी पेमेंट सर्विस सुरू करणार आहे. भारतातील व्हॉट्सअँपचे युजर्स पाहता व्हॉट्सअँप पेला भारतात उत्तम प्रतिसाद मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हॉट्सअँप देशातील डिजिटल व्यवहाराला चालना देण्यास फायदेशीर ठरणार असून ही सर्व्हिस Google Pay आणि Paytm टक्कर देणार आहे.

Previous articleराहुरी फॅक्टरी येथील अवैध धंदे बंद करावेत,ही काळाची गरज आहे
Next article*वडगांव शहरात आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते केक एन जाँय शाँपीचे उदघाटन*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here