Home बुलढाणा प्लॅस्टिकच्या पिशव्या खाल्ल्यामुळे कितीक” शेळ्या दगावल्या… स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेकडून ग्राम विकास...

प्लॅस्टिकच्या पिशव्या खाल्ल्यामुळे कितीक” शेळ्या दगावल्या… स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेकडून ग्राम विकास अधिकारी यांना निवेदन

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0027.jpg

प्लॅस्टिकच्या पिशव्या खाल्ल्यामुळे कितीक” शेळ्या दगावल्या…

स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेकडून ग्राम विकास अधिकारी यांना निवेदन

युवा मराठा न्यूज विशेष प्रतिनिधी

संग्रामपूर तालुक्यातील अतिवर्धनेच्या ठिकाण असलेल्या वरवट बकाल ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी यांचा चालतो मनमानी कारभार . वरवट बकाल येथील गावकऱ्यांच्या अनेक समस्या चे निवारण न करता स्वतःच्या मनमानी कारभाराने बरेचसे वरवट बकाल ग्राम वासी हैराण झाले आहे. त्यामुळे स्वतंत्र महाराष्ट्र कामगार संघटना कडून १९ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला निवेदन सुद्धा दिले परंतु ग्रामसेवक बोडके यांनी कोणतीच दखल घेतली नाही तर वरवट बकाल बकाल येथील नागरिकांनी काय करावे..? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे अशातच काही दिवसा अगोदर स्वातंत्र्य महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने गावातील अनेक समस्याचे निवारण होत नाही गावकऱ्यांनी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे यावर ग्रामविकास अधिकारी यांना कोणी पाठीशी तर घालत नाही ना यांच्या अशा वागण्याने हे कोणाच्या आशीर्वादाने काम चालू आहे.
असा प्रश्न निर्माण झाला आहे यावर गावकऱ्यांनी न्याय कोणाला मागावा गावातील समस्या कोणाजवळ मांडाव्या या अशा वागण्याने गावकरी संभ्रमात पडले आहे.
♦️ ग्रामपंचायतला लागूनच असलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळे आरोग्य धोक्यात संग्रामपूर तालुक्यातील मध्यवर्ती असलेले ठिकाण म्हणजे वरवट बकाल या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय च्या वर्तनामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याचे कारण असे की ग्रामपंचायतला लागूनच मोठा कचऱ्याचा ढीग व काडीकचरा असल्यामुळे हवा आली की पूर्ण घरामध्ये कचरा भरते याचा दुर्गंध सुद्धा पसरते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्याकरिता स्वतंत्र कामगार संघटना यांच्या वतीने ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले आहे सदर कचऱ्याचे विल्हेवाट लावण्यात यावी जेणेकरून गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही असे निवेदन देण्यात आले परंतु ग्रामसेवक यांनी कोणतीही दखल घेतली नाही. अशी तक्रार स्वातंत्र महाराष्ट्र कामगार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष कारीस शेख मोहम्मद यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here