Home बुलढाणा संग्रामपुर तहसिलदार वरणगावकर जेंव्हा शेतात तिफन हाकलतात तेंव्हा ..?

संग्रामपुर तहसिलदार वरणगावकर जेंव्हा शेतात तिफन हाकलतात तेंव्हा ..?

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20220625-WA0008.jpg

संग्रामपुर तहसिलदार वरणगावकर जेंव्हा शेतात तिफन हाकलतात तेंव्हा ..?

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

संग्रामपुर:– एका खेड्यावर शासकिय कामानिमित जाऊन येत असतांना एका शेतात पेरणीच काम शेतकरी करीत असल्याचे पाहून आपली गाडी रस्त्याच्या कडेला लाऊन त्या शेतात सुरु असलेल्या तिफन वर स्वतः तिफन हाकालतांना संग्रामपूरचे तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावंकर साहेब हे दिसतात परंतु एका प्रकारे खरोखरच शेतकऱ्यांच्या व्यथा व काही शेतकऱ्यांवर शासकीय कार्यालयात होणारा अन्याय शेतकऱ्यांना शेतीचे काम मागे ठेवून स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाकरिता व इतर लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांन करिता तलाठी कार्यालय असो ग्रामपंचायत असो किंवा खुद्द तहसील कार्यालय अशा ठिकाणी चकरा माराव्या लागतात आणि वस्तुस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी लीगल पन्नास रुपयात काम व्हायला पाहिजे अशा ठिकाणी शेतकऱ्यांना राबराब कष्ट करून कमावलेले हजारो रुपये खर्च करावे लागतात परंतु या कोणत्याच गोष्टीची जाण न ठेवता फक्त नाट्यमय कार्यक्रम व खोटारडा दिखावे पणा तहसीलदार वरणगावकर हे असेच काहीसे करतांना दिसुन येतात. कारण कुठल्याही शेतकऱ्याला शेती विषयी योग्य मार्गदर्शन करण्याच्या हेतूने किंवा शेतीकामाची आवड म्हणून तिफन हाकलायला तहसीलदार वरणगावकर हे शेतात जाऊच शकत नाहीत. कारण त्यांना जर शेतकऱ्यांविषयी एवढे प्रेम असते तर त्यांनी तालुक्यातील शासकीय कार्यालयात शेतकऱ्यांना होणार्या त्रासाला वेळीच लगाम लावण्याचा प्रयत्न केला असता कारण संग्रामपूर तहसील अंतर्गत चालू असलेला भ्रष्टाचार त्यामध्ये बरेचसे महसूल प्रकरणे प्रलंबित आहेत नक्कल विभागातील काही नागरिकांचे अनेक महिन्यापासून आलेले नक्कल चे अर्ज प्रलंबित आहेत व अक्षरशहा ज्या तहसील कार्यालयाचे सिद्धेश्वर वरणगावकर हे तहसीलदार आहेत त्याच कार्यालयातील काही कर्मचारी हे मुख्यालयी राहत नसल्यामुळे कर्तव्यावर त्यांच्या कार्यालयीन वेळेत न येता उशिरा कार्यालयात येतात व कार्यालयीन वेळ संपण्याच्या आधीच निघून जातात याकडे मात्र सिद्धेश्वर वरणगावकर साहेबांना अशा गंभीर बाबीकडे लक्ष देण्याकरिता वेळ मिळत नाही विशेषतः पंचायत समिती व कृषी विभाग व तालुक्यातील इतरही शासकीय कार्यालयात फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे दिसून येते याकडे लक्ष केंद्रित करून स्वतःचे कर्तव्य समजून अशा कामाकरता वेळ न देता फक्त सामान्य नागरिकांची दिशाभूल करून त्यांचे मन जिंकण्यासाठी स्वतःची वा वा करून घेण्यासाठी असले प्रकार करताना संग्रामपूर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर हे दिसतात. तरी संपूर्ण तालुक्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचे कामे शासकीय कार्यालयात प्रलंबित असतील त्या कामांचा आढावा घेऊन जर त्या शेतकऱ्यांना कामचुकार कर्मचाऱ्यांकडून होणारा त्रास थांबवून प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे प्रयत्न करायला हवे असे झाल्यास खरोखरच “माननीय तहसीलदार साहेबांचे काम” कौतुकास्पद ठरेल.

Previous articleआमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबास चार लाख रुपये मदत
Next articleछावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here