Home नाशिक आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबास चार लाख रुपये...

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबास चार लाख रुपये मदत

213
0

आशाताई बच्छाव

IMG-20220624-WA0045.jpg

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबास चार लाख रुपये मदत
नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसामध्ये मोठे नुकसान झाले होते यामध्ये वीज पडून तळवाडे तालुका नांदगाव येथील इसम शांताराम सखाहरी निकम वय वर्ष साठ यांचा मृत्यू झाला तसेच दोन बैल मयत झाले होते.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सदर घटनेचा शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर शासन निर्णयानुसार नैसर्गिक आपत्ती ग्रस्तांसाठी तातडीची मदत उपलब्ध करून देण्यात येत असते या अनुसार सदर मयत यांच्या वारस श्रीमती मंगलाबाई शांताराम निकम (पत्नी) यांना आज आज दिनांक 24 जून रोजी तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या उपस्थितीत व सौ.अंजूमताई सुहास कांदे यांच्या हस्ते चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी नायब तहसीलदार चेतन कोनकर, अव्वल कारकून संतोष डुमरे,महसूल सहाय्यक धनराज बच्छाव, शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे,प्रमोद भाबड, शहर प्रमुख सुनील जाधव, विद्या जगताप संगिता बागुल,रोहिणी मोरे, सागर हिरे,सदाम शेख आरीफ शेख भाऊराव बागुल,संजय आहेर हे उपस्थित होते.

Previous articleराजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Next articleसंग्रामपुर तहसिलदार वरणगावकर जेंव्हा शेतात तिफन हाकलतात तेंव्हा ..?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here