Home रत्नागिरी छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद

छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद

79
0

आशाताई बच्छाव

IMG-20220625-WA0009.jpg

छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद

रत्नागिरी : सतत मोबाईल पाहिल्याने डोळ्यांवर दाब पडतो. तसेच डोळ्यांचेही खूप नुकसान होऊ शकते. मोबाईलची निळी स्क्रीन सतत पाहून डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. यामुळे तीव्र डोकेदुखी, डोळे दुखणे, तसेच डोळे कोरडे होण्याची भिती असते. मोबाईल, संगणक, एलईडी स्क्रीन, यामधून बाहेर पडणारी किरणे डोळ्यांसाठी घातक असतात. सतत स्क्रीन पुढे डोळे असल्यास सुरुवातीला डोळ्यांची जळजळ होणे हे डोळ्यांच्या विकारातील प्रमुख लक्षण आहे. याचा विद्यार्थांच्या डोळ्यावर पर्यायी नजरेवर परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांची जळजळ, अंधूकपणा / अस्पष्टपणा, डोळ्यातून पाणी येणे इतर समस्या उद्गवतात त्याचा परिणाम मुलांच्या तब्बेतीवर व अभ्यासावर होतो. त्यामुळे मुलांचे स्वास्थ उत्तम राहण्यासाठी व उद्धवना-या समस्यांचे वेळेआधी निराकारण करण्यासाठी या कार्यक्रमाचे जाकादेवीत तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शुराम कदम कनिष्ठ महाविद्यालय मध्ये च्या हॉलमध्ये शुक्रवारी दिनांक २४.०६.२०२२ रोजी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला. यामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेच्या १४८ मुला – मुलीनी नेत्र तपासणी केली. या उपक्रमाचे सर्व शैक्षणिक व सामाजिक स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.

दिपप्रज्वलन व मनोगत व्यक्त करुन या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शुराम कदम कनिष्ठ महाविद्यालय चे मुख्याध्यापक परकर सर यांच्या हस्ते छावा चे संस्थापक / अध्यक्ष सुनिल धावडे यांना पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक प्रतिकजी देसाई, विद्यालयाचे मुख्याध्यापक परकर सर, नंदादिप आयकेअर चा संपुर्ण स्टाफ, विद्यालयाचा शिक्षक वृंद, छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे सचिव समिर गोताड, खजिनदार गणेश कांबळे, संघटक समिर धावडे, कार्याध्यक्ष संतोष आग्रे, मिडिया प्रमुख नितिन रोडे, सदस्य संदेश धावडे, सचिन धावडे, चंद्रकांत गोताड, प्रकाश गोताड आदींसह बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous articleसंग्रामपुर तहसिलदार वरणगावकर जेंव्हा शेतात तिफन हाकलतात तेंव्हा ..?
Next articleचोरट्यांचा हात साफ तब्बल 3 दुकान फोडून 22500 रु मुद्देमाल लंपास
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here