• Home
  • 🛑राज्य सरकारची वाटचाल हुकूमशाही कडे – दानवेंचा आरोप 🛑

🛑राज्य सरकारची वाटचाल हुकूमशाही कडे – दानवेंचा आरोप 🛑

🛑राज्य सरकारची वाटचाल हुकूमशाही कडे – दानवेंचा आरोप 🛑
✍️ जालना 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

जालना :⭕ मराठा महासंघाचे कार्यकर्ते पालकमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते.

निवेदन स्वीकारणं पालकमंत्र्यांसाठी काही अवघड गोष्ट नाही. पण या सरकारला जनतेला वेठीस धरायचं आहे. त्यामुळे राज्य सरकारची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरु असल्याचा हल्लाबोल भाजप आमदार संतोष दानवे यांनी केला आहे. आज मराठा महासंघाच्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याना पोलिसांनी ज्या पद्धतीने ताब्यात घेत अटक केली आहे. ही घटना निदंनीय असल्याची भावना ही आमदार संतोष दानवे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा महासंघाचे कार्यकर्त्यांनी गुरूवारी सकाळी आंदोलन केलं. जय जिजाऊ जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या विरोधात मराठा महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. मराठा समाजातील महिला- पुरुषांनी हातात भगवे आणि काळे झेंडे घेऊन आंदोलन केले.

मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्यात यावे, आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यात यावी, सारथी संस्थेला निधी उपलब्ध करून द्यावा, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचा लाभ द्यावा, एईसीबीसी विद्यार्थ्याना आर्थिक सवलती सुरू ठेवाव्यात अशा विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले….⭕

anews Banner

Leave A Comment